Career Success Story : एकाचवेळी तिन्ही सैन्यदलात निवड; रोजंदारी करणाऱ्या तरुणाला लागली नोकरीची लॉटरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल जे स्वप्न पाहिलं (Career Success Story) आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितकं झोकून देवून काम कराल तेवढ्या वेगाने तुमचे ध्येय तुमच्या जवळ येईल. असाच एक ध्येयवेडा तरुण आहे पश्चिम राजस्थानमधील बारमेर या छोट्याशा गावातील. भाचभर येथील रहिवासी असलेल्या प्रवीणने गुजरातमधील मोरबी येथे ७ महिने रोजंदारी कामगार म्हणून काम केले आणि आता त्याची भारताच्या तिन्ही सैन्य दलात एकाचवेळी निवड झाली आहे.

प्रसंगी रोजंदारी केली
प्रवीणच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्याने गुजरातमधील मोरबी येथे अनेक महिने रोजंदारी मजूर म्हणून काम केले आहे. किती दिवस रोजंदारी करणार? यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून आयुष्यभर घर खर्च भागू शकत नाही. यासाठी नोकरी मिळणं गरजेचं आहे. यासाठी मोल-मजुरी करत असताना त्याचा अभ्यासही सुरु होता.

एकाचवेळी तिन्ही सैन्य दलात निवड (Career Success Story)
सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याने मोठ्या हिमतीने सैन्य भरतीसाठी अर्ज केला. सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा पास व्हायही होती. त्याने अभ्यासासाठी कठोर परिश्रम घेतले. परीक्षा दिली.. निकाल जाहीर झाला तेव्हा प्रवीणला लॉटरी लागली होती. त्याची भारताच्या तिन्ही सैन्य दलात एकाच वेळी निवड झाली. बाडमेरच्या भाचभर या छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रवीणच्या या अतुलनीय यशामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य खूप आनंदी झाला.

भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न 
प्रवीण सांगतो की, त्याचे वडील रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले आहेत. घरात चार बहिणींच्या लग्नात खर्च झाल्याने त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कोलमडले. अशा परिस्थितीत हायस्कूलच्या शिक्षणानंतर तो गुजरातमधील मोरबी येथे मजूर म्हणून काम करु लागला. त्याच्या मनात भारतीय सैन्यात (Career Success Story) भरती होण्याची इच्छा होती.
प्रवीणचे प्रयत्न सुरु होते. त्याने देशाच्या तिन्ही दलात सहभागी होण्यासाठी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे त्याची एकाचवेळी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये निवड झाली. आता तो सैन्यात भरती होणार आहे. त्याच्या प्रवासाबाबत त्याला त्याचे वडील देवराम पोतालिया आणि आई लक्ष्मीदेवी यांनी साथ दिली.
लष्करात वरिष्ठ अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे प्रवीणचे स्वप्न आहे. परिस्थिती पुढे जे हार मानतात त्यांच्यासाठी प्रवीण म्हणतो की, “पहिले अपयश कधीच शेवटचे नसते. प्रत्येक यश हे केवळ मेहनतीमुळेच मिळते.” एकेकाळी घरासाठी आणि शिक्षणासाठी रोजंदारी करायला भाग पडलेल्या प्रवीणने मिळवळेले यश तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com