करिअरनामा ऑनलाईन । ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशात (Career Success Story) प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिची डॉक्टर होण्याची इच्छा होती. तिने राजकारणातही प्रवेश केला. विशेष म्हणजे तिला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. तरी तिने हे सगळे पर्याय नाकारले आणि हिमाचल प्रशासकीय सेवेत (HAS) ती अधिकारी बनली. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. हे वाचून तुम्ही थक्क झाला असाल पण ओशिनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेकदा अपयश आले पण तिने हार मानली नाही.
कुटुंबात आहे अभ्यासाचे वातावरण
ओशिन शर्मा ही हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती शिमल्यात लहानाची मोठी झाली. तिचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा (Career Success Story) येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करते. कुटुंबात अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण होते. पूर्वी ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर महाविद्यालयीन काळात ती विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाली. ओशिनने पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
अधिकारी होण्यासाठी कुटुंबाने दिला पाठिंबा
ओशिन शाळेपासून अभ्यासात हुशार होती. तिची अभ्यासातील गोडी पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला नागरी सेवेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. नागरी सेवेत रुजू होण्याचे तिचे ध्येय बनले. यासाठी तिने जोरदार तयारी सुरू केली. अनेकवेळा तिला यश अपयशाचा सामना करावा लागला.
शेवटपर्यंत हार मानली नाही
ओशिनची धडपड सुरूच होती. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (Career Success Story) तिने अनेक प्रयत्न केले. अनेक परीक्षाही दिल्या. अनेक प्रयत्नांनंतर ती 2019 मध्ये हिमाचल प्रशासकीय सेवेची परीक्षा पास झाली. या परिक्षेत तिने कसून मेहनत घेतली आणि 10 वा क्रमांक मिळवला. तिची बीडीओ पदावर निवड झाली.
चित्रपटाच्या येत होत्या ऑफर्स
ओशिनचा लूक पाहून तिला चित्रपटाच्या ऑफर्सही आल्या. पण ओशिनच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. खुद्द ओशिनसुद्धा चित्रपटात काम करण्यासाठी तयार नव्हती. अशा परिस्थितीत तिने चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या. तिला समाजसेवा करण्यात रस होता; त्यामुळे त्याच दिशेने तिची वाटचाल सुरु राहिली.
सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स
ओशिन ही लाडली फाउंडेशनची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सोशल (Career Success Story) मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूप मोटिव्हेशनल पोस्ट करत असते; त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com