Career Success Story : शाळेने 10 वीच्या परीक्षेस बसू दिले नाही; त्याने शाळाच सोडली; आज आहे फोर्ब्सच्या यादीतील अब्जाधीश!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । निखिल कामत यांची गणना अशा मोजक्या (Career Success Story) लोकांमध्ये केली जाते ज्यांनी अगदी कमी वयात स्वतःच्या मेहनतीने यश संपादन करुन प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांची कंपनी ‘झिरोधा’ ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. निखिल कामतचा अब्जाधीश बनण्याचा प्रवास तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो.

‘झिरोधा’ ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म असून ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत या कंपनीने अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकले आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढत जात आहे. स्टॉक ब्रोकिंग करणाऱ्या झिरोधाची सुरूवात २०१० मध्ये बेंगळूरुचे नितीन आणि (Career Success Story) निखिल कामत या बंधूंनी केली. झिरोधा ही देशातील पहिली डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना निखिल कामत आणि झिरोधा या दोन्ही नावांची माहिती असेलच. पण ही कंपनी नावारूपाला येण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता.. निखिल कामत यांना ही कल्पना कही सुचली, कोणकोणती आव्हाने समोर आली; आणि या कंपनीला कसं यश मिळालं हे आज आपण पाहणार आहोत…

पहिली नोकरी कॉल सेंटरमध्ये (Career Success Story)
शिक्षण अर्धवट सोडून निखिलने अवघ्या 17 व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा कॉल सेंटरमध्ये काम केले, जिथे त्यांना फक्त 8 हजार रुपये दरमहा पगार मिळायचा. आज त्यांची नेटवर्थ यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. निखिलच्या यशाची कहाणी शेअर मार्केट ट्रेडिंगपासून सुरू झाली.
कामत यांनी जेव्हा शेअर मार्केट ट्रेडिंग सुरू केले तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरातच त्यांनी बाजाराची किंमत ओळखली आणि गांभीर्याने ट्रेडिंग करायला सुरवात केली. याचाच परिणाम असा झाला की आज त्यांचे नाव अब्जाधीशांमध्ये सामील झाले आहे.

सेकंड हँड फोन विकायचा (Career Success Story)
निखिल कामत १४ वर्षांचा असताना त्यांनी वापरलेले फोन विकायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला. हा प्रकार त्यांच्या आईला कळताच तिने सर्व फोन फेकून दिले. अभ्यासाबाबत मुलाच्या निष्काळजी वृत्तीचा शाळा प्रशासनाला राग होता, त्यामुळे त्यांनी निखिलला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधी दिली नाही. मात्र यानंतर कामत यांनी शाळाच सोडली.

वडिलांच्या बचतीतून सुरु केला व्यवसाय
निखिल कामतच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या बचतीपैकी काही रक्कम दिली आणि या पैशाचा योग्य वापर करण्यास सांगितले. इथूनच कामत शेअर मार्केटमध्ये दाखल झाले. वडिलांचा आपल्या मुलांवर विश्वास होता आणि याच विश्वासाने वडिलांनी निखिलवर पैशाची बचत व्यवस्थितपणे सांभाळण्याची (Career Success Story) जबाबदारी टाकली. हळूहळू निखिलने मार्केटवर पकड मिळवायला सुरुवात केली आणि काही काळानंतर ते त्यांच्या मॅनेजरला शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास राजी करण्यात यशस्वी झाले. याचा फायदा मॅनेजरला झाल्यावर त्यांनी निखिलला मॅनेज करण्यासाठी इतर लोकांकडून पैसेही घेतले.

अशी झाली ‘झिरोधा’ची सुरूवात
निखिल कामत यांना त्यांच्या वडिलांनी भरपूर साथ दिली. त्याने आपल्या कॉल सेंटरमधील सहकाऱ्यांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी पटवून दिले. अशा प्रकारे त्यांची (Career Success Story) स्टॉक ब्रोकिंगमधील कारकीर्द सुरू झाली तर, 2010 मध्ये झिरोधा लाँच करण्यात आले आणि 2021 मध्ये निखिल कामत वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी अब्जाधीश बनले. विशेष म्हणजे झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही कंपनीत कोणी बाहेरून पैसे गुंतवलेले नाहीत. असे असूनही आज झिरोधा हजारो कोटी रुपयांची कंपनी बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com