Career Success Story : खाकितील ‘मर्दानी’!! अंडरवर्ल्ड डॉनचाही भितीने उडायचा थरकाप; आव्हानांना न घाबरणाऱ्या IPS मीरा बोरवणकर 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक महिलांनी आपल्या (Career Success Story) स्व कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. IPS मीरा बोरवणकरही त्यापैकीच एक आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर सर्वोत्तम IPS अधिकार्‍यांमध्ये घेतले जाते. त्या देशभरात ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या 1981 च्या बॅचच्या IPS अधिकारी असून सध्या त्या सेवा निवृत्त झाल्या आहेत.

वडील BSF मध्ये अधिकारी तर पती IAS
मीरा बोरवणकर यांचे वडील ओ.पी.चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात (BSF) अधिकारी होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे झाली होती. मीरा यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फाजिल्का येथेच झाले. 1971 मध्ये वडिलांची बदली झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण जालंधर येथून पूर्ण केले. माजी IPS किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार केला. त्यांचे पती अभय बोरवणकर हे देखील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते आणि सध्या ते नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत.

अंडरवर्ल्डमध्ये दहशत
मीरा बोरवणकर यांची IPS पदी निवड झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. पदभार स्वीकारल्या नंतर धडक कारवाया करत त्यांनी मुंबईतील माफिया राजवट संपवण्यात (Career Success Story) महत्त्वाची भूमिका बजावली होती. दाऊद ईब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेकांना तुरुंगात टाकून त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अजमल कसाब आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला मीरा यांच्या देखरेखीखाली फाशी देण्यात आली.

सेक्स स्कँडल उधळले
या नावाला आणखी प्रसिध्दी मिळाली जेव्हा 1994 मध्ये जळगाव येथे मोठ्या सेक्स स्कँडलची माहिती मिळाली आणि त्यांनी हे स्कँडल उधळून लावले. त्यांनी या स्कँडलमध्ये अडकलेल्या शाळकरी मुलींपासून ते महाविद्यालयीन मुलींपर्यंत सर्वांना वाचवण्याचे काम केले. या कारवाईपासून त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ देखील म्हटले जाते. या कार्याची दखल घेत बोरवणकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लिंग भेदाचा सामना करावा लागला (Career Success Story)
बोरवणकर त्यांनी 36 वर्षांची पोलिस कारकिर्द पूर्ण केली आहे. काम करत असताना सुरवातीच्या काळात त्यांना लिंग भेदाचा सामना करावा लागला पण जेव्हा त्या उच्च पदावर पोहोचल्या तेव्हा हा भेदभाव कमी झाला असल्याचे त्या सांगतात. मुलींना कार्यशक्तीमध्ये येण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे तयांचे उद्दिष्ट आहे. त्या म्हणतात; ” मी देखील एका लहान शहरातील आहे आणि ग्रामीण आणि बी-टाउनमधील मुलींची स्थिती किती वाईट आहे याची मला जाणीव आहे. यासाठी मला अशा मुलींना मार्गदर्शन करायचे आहे जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढेल.”

‘मॅडम कमिशनर’
मीरा बोरवणकर यांनी आपल्या पोलिस करकीर्दीविषयी भाष्य करणारे ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक नुकतंच लिहलं आहे. या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री ‘दादा’ यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे; यामुळे सध्या मीरा बोरवणकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद पेटला असून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

बोरवणकर यांनी बेधडक कारवाया (Career Success Story) केल्या. प्रसिध्द अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. मीरा बोरवणकर या आपल्या देशातील सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com