करिअरनामा ऑनलाईन । आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या (Career Success Story) खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रात कामगिरी करून महिलांनी स्वतःबरोबर देशाचं नाव मोठं केलं आहे. तुमचाही उर अभिमानाने भरून येईल अशी एक बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत असलेल्या राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यूनायडेट नेशन्सच्या वतीने सन्मानित करण्यात आलं आहे. ‘यूनायटेड नेशन्स मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…
यूनायडेट नेशन्सकडून सन्मानित
मेजर राधिका सेन या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने हिमाचल प्रदेशसह संपूर्ण देशाचे नाव मोठे केले आहे. मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या (Career Success Story) सर्वात मोठ्या सैन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यूनायटेड नेशन्स मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कांगो मध्ये संयुक्त राष्ट्र शांती रक्षक दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांना सन्मानित केले आहे.
टीम कमांडर म्हणून पार पाडली महत्वपूर्ण जबाबदारी (Career Success Story)
मेजर राधिका सेन या मार्च 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत काँगो लोकशाही प्रजासत्ताक येथे तैनात होत्या. त्या इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनच्या टीम कमांडर होत्या. यामध्ये त्यांनी 20 महिला आणि 10 पुरुष सैनिकांच्या टीमचे नेतृत्व केले आहे. मेजर राधिका यांचे काम काँगोच्या लोकांशी संवाद करणे, संघर्षग्रस्त भागातील महिला आणि मुलांना हिम्मत देणे आणि विस्थापित लोकांच्या समस्या सोडवणे हे होते. राधिका यांच्या नेतृत्वाखालील टीमने लैंगिक समानता, बेरोजगारी हटवणे, मुलांची काळजी घेणे, लोकांना शिक्षित करणे आणि महिलांना आरोग्याबाबत जागरूक करणे; या विषयांवर शैक्षणिक सत्रे आयोजित केली.
8 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात दाखल
मेजर राधिका सेन या मूळ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर तालुक्यातील भडोह वार्डातील रहिवासी आहेत. त्यांनी बायोटेक्नोलॉजी इंजीनिअरींगच्या शिक्षणानंतर आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथून मास्टर्सचे शिक्षण घेतले. त्या 8 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अत्यंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या मेजर राधिका सेन या दुसऱ्या भारतीय सैनिक आहेत. याआधी मेजर सुमन गवानी यांना 2019 मध्ये युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुलीचे यश जनतेला समर्पित (Career Success Story)
राधिका यांचे वडील ओंकार सेन यांनी आपल्या मुलीचे यश हे देशाचे सैन्य, देशवासीय आणि सुंदरनगरच्या जनतेला समर्पित केले आहे. राधिका यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
राधिका सेन यांचे वडील ओंकार सेन हे सरकारी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, हमीरपूर येथून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. तर आई निर्मला सेन या चौहार व्हॅलीच्या कथोग शाळेतूनशिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या आहेत. राधिकाच्या वडिलांना तीन भाऊ आहेत आणि चारही भावांना प्रत्येकी दोन मुली आहेत. त्यांच्या सर्व मुली उच्च पदांवर कार्यरत आहेत; हे सर्वजण कुटुंबासह देशाचे नाव मोठे करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com