Career Success Story : लग्नानंतर संसार सांभाळत झाली IPS; जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांवर ठेवते करडी नजर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण भेटणार आहोत तनु श्रीला. तनु (Career Success Story) श्री सध्या जम्मू-काश्मीर येथे एसएसपी म्हणून कार्यरत आहे. तनु श्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. IPS होण्यापूर्वी तिने इतर अनेक पदांवर काम केले आहे; तिची कहाणी वाचून तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल.
तनू श्रीने तिच्या कर्तृत्वाने हे दाखवले आहे की तुम्ही तुमचे लक्ष्य वाढवून ते कोणत्याही परिस्थितीत साध्य करू शकता. तनु श्री तिच्या ध्येयांबद्दल खूप जागरूक होती. ध्येय गाठल्यानंतर ती थांबली नाही. मग तिने समोर आणखी एक लक्ष्य ठेवले. तिने करिअरच्या सुरवातीला आधी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट पद मिळवलं. नंतर आयकर अधिकारी आणि त्या नंतर ती IPS बनली आहे.

मोठ्या बहिणीने दिली प्रेरणा
तनु श्रीचे प्रारंभिक शिक्षण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात झाले. वडिलांच्या पोस्टिंगच्या काळात ती वेगवेगळ्या संस्थांना भेट देत राहिली. तिने डीएव्ही पब्लिक स्कूल, बोकारो येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ती दिल्लीत आली. प्रशिक्षणासोबतच तिने सेल्फ स्टडीवरही भर दिला. तिची मोठी बहीण मनुश्री देखील सीआरपीएफ कमांडंट आहे. मनुश्रीने या संपूर्ण प्रवासात धाकट्या बहिणीला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.

लग्नानंतर झाली IPS (Career Success Story )
2014 मध्ये तनु श्री केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) दाखल होत ती असिस्टंट कमांडंट बनली. हे महत्त्वपूर्ण पद मिळवल्यानंतरही ती थांबली नाही. तीने स्वत:समोर आणखी आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. तिला UPSC ची परीक्षा द्यायची होती. अथक परिश्रम घेतल्यानंतर ती 2016 मध्ये परीक्षेला बसली. मे 2017 मध्ये तिचे स्वप्न पूर्ण झाले. तिची IPS पदावर निवड झाली. तनुश्रीचा IPS चा प्रवास हैदराबादमधील प्रतिष्ठित पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण घेऊन सुरु झाला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर तिने IPS पद मिळवलं आहे.

संसार सांभाळत पेलते जबाबदारी
तनु श्रीचे वडील सुबोध कुमार यांनी डीआयजी (DIG) पद सांभाळले आहे. ते तिच्यासाठी आदर्श आहेत. तनु श्री ने जे यश मिळवले आहे त्याचे सर्व श्रेय ती तिच्या पालकांना देते. 2015 मध्ये तिचे लग्न झाले. यानंतरही तिने घरगुती जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळत आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. याचा तिच्या कुटुंबीयांना अभिमान वाटतो. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस अधिकारी बनणे अजिबात सोपे नाही. येथे काम करणारे कायदा आणि सुव्यवस्था राखतात आणि दहशतवादी-संबंधित कारवायांवर नियंत्रण ठेवतात. यासोबतच पोलिसांना सर्वसामान्यांचा विश्वासही कायम ठेवावा लागतो.

सोशल मीडियावर असते सक्रिय
सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडंट ते आयकर विभाग आणि त्यानंतर (Career Success Story) आयपीएस अधिकारी या प्रतिष्ठित पदापर्यंतचा तनु श्रीचा प्रवास आश्चर्यकारक आहे. हा प्रवास तनुश्रीचे समर्पण, कठोर परिश्रम आणि तिच्या कुटुंबाच्या अतूट पाठिंब्याचा दाखला देते. तिने केलेले कर्तुत्व कौतुक आणि आदरास पात्र आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 121 हजार फॉलोअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com