Career Success Story : “परीक्षेचं सिक्रेट कोणाला सांगू नका.” 4 वेळा नापास झालेल्या IPS तरुणाने दिला यशाचा कानमंत्र 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोलिस सर्व्हिसचा तरुण (Career Success Story) अधिकारी रोशन कुमार याने 2013 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. यानंतर तो सलग चार वेळा नापास झाला. अखेर 2018 मध्ये त्याने आपले ध्येय साध्य केले. रोशन कुमारने या परिक्षेत संपूर्ण भारतातून 114 वा क्रमांक मिळवला आहे. या रँकसह त्याला भारतीय पोलीस सेवा देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित मानली जाते. तरीही दरवर्षी हजारो तरुण IAS-IPS होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. अनेकजण नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी करतात आणि यशही मिळवतात. IPS रोशन कुमार  त्यापैकीच एक आहे. नोकरीसोबतच त्याने UPSC ची तयारी केली आणि अनेकवेळा अपयश आले तरी त्याने हार मानली नाही. जाणून घेऊया त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कहाणी….

नोकरी करत असताना सलग 5 वेळा दिली लोकसेवा आयोगाची परीक्षा
रोशन कुमार याची कथा ही अनेक अपयशांची कहाणी आहे. तो पडत होता, धडपडत होता पण थांबत नव्हता. रोशन कुमारने नोकरी करत असतानासुध्दा UPSC चा अभ्यास सुरु ठेवला. रोशनच्या (Career Success Story) परीक्षेच्या प्रयत्नांबद्दल सांगायचे तर, पहिल्या दोन प्रयत्नांत तो पूर्व परीक्षा पासही होऊ शकला नाही. त्यानंतरच्या प्रयत्नांमध्ये तो पूर्व परीक्षा पास झाला पण मुख्य परिक्षेत सफल होवू शकला नाही. अखेरीस परीक्षेच्या पाचव्या प्रयत्नात 2018 मध्ये त्याला परीक्षेत यश आले.

परीक्षेचा विषय सिक्रेट ठेवा
IPS रोशन कुमार म्हणतो; “काही खास लोक सोडले तर इतर कोणालाही UPSC च्या तयारीबद्दल सांगू नका. या परीक्षेला खूप मागणी असून त्यात यश मिळणे खूप अवघड आहे; त्यामुळे इतरांना सांगून त्यांच्या अपेक्षांचे ओझे स्वतःवर लादून घेवू नका. परीक्षेचा विषय सिक्रेट ठेवा;” असं त्याचं मत आहे.
रडण्याऐवजी मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करा
रोशन कुमारने स्वत: नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी केली आहे. त्याचे म्हणणे आहे की जर तुम्हाला नोकरीसोबतच UPSC द्यायची असेल तर तुमच्या अभ्यासाला व्यावसायिक जिवनक्षी जोडून घ्या. हे समजून घ्या की तुम्ही कार्यरत व्यावसायिक असल्याने तुम्हाला वेगळा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही. अभ्यास आणि नोकरी यामध्ये तुम्हाला सांगड घालायची आहे. त्यामुळे रडण्याऐवजी, मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करा.

तुमचे ऑफीस आणि सहकाऱ्यांचे ऋणी रहा
रोशन कुमार सांगतात की, ऑफिसमध्ये अनेक समस्या असल्याने आणि अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्यामुळे गोंधळ घालू नका. ऑफिसमध्ये असताना तिथले काम हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे. तुमची नोकरी आणि सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञ रहा. नोकरीतून मिळालेला अनुभव परीक्षेच्या काळात खूप उपयोगी पडणार आहे. विशेषतः मुलाखतीच्या वेळी नोकरीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात.
कार्यक्रम, संमेलनापासून दूर रहा (Career Success Story)
IPS रोशन कुमार सल्ला देतात की तुम्ही UPSC ची तयारी करत असाल, मग ते कार्यालयीन संमेलन असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सर्वांपासून लांब रहा. जिथे तुमच्याशिवाय काम होऊ शकते तिथे जाऊ नका. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा फक्त अभ्यासाला वेळ द्या. ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये 10 मिनिटांत जेवण पूर्ण करा आणि उरलेल्या वेळेत अभ्यास करा.

लिखानाचा सराव करा
रोशनचा असा विश्वास आहे की नोकरी करत अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही. म्हणूनच उत्तर लेखनाचा सराव सुरु ठेवा. उत्तरे लिहिण्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. मॉक टेस्ट देणं हे देखील फायद्याचं ठरत असल्याचं तो म्हणतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com