Career Success Story : क्रिकेट सोडून UPSC निवडली; आधी इंजिनिअर आणि नंतर झाला IPS; कशी होती अभ्यासाची रणनिती? 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपणा सर्वांनाच माहित आहे, की (Career Success Story) क्रिकेटमध्ये प्रसिद्धी बरोबरच पैसाही खूप मिळतो. पण तरीही काही लोक क्रिकेट सोडून सरकारी सेवेत सामील होतात. आज आपण अशाच एका IPS अधिकाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत. या तरुणाचे नाव आहे कार्तिक मधीरा. तो महाराष्ट्र केडरचा IPS अधिकारी आहे. चला जाणून घेऊया एक क्रिकेटर IPS अधिकारी कसा बनला याविषयी..

क्रिकेट सोडावे लागले
महाराष्ट्र केडरचा विद्यार्थी कार्तिक मधीरा मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. भारतीय पोलिस सेवेत रुजू होण्यापूर्वी, त्याने 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील गटामध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहे. पण त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याच्या करिअरची दिशाच बदलून गेली.

कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची घेतली पदवी (Career Success Story)
कार्तिकने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. कार्तिकने क्रिकेट सोडून IPS बनण्यामागे दुखापत आणि काही वैयक्तिक कारणे होती. त्याने काही काल खासगी क्षेत्रात नोकरीही केली. यावेळी त्याच्या लक्षात आले; की त्याचे व्यक्तिमत्व केवळ नागरी सेवा करण्यासाठीच तयार झाले आहे.

तीनवेळा झाला नापास
अखेर कार्तिकने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरला. कार्तिकला यूपीएससीच्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागला. त्याला पूर्व परीक्षाही पास करता आली नाही. पण त्याने हार न मानता आपली तयारी सुरुच ठेवली. समाजशास्त्र या पर्यायी विषयाच्या (Career Success Story) अभ्यासावर त्याने जास्त भर दिला.
UPSC च्या वेगवेगळ्या फेऱ्यांची तयारी करण्याऐवजी त्याने एकाच वेळी पूर्ण तयारी करण्यावर भर दिला. कार्तिकने अवलंबलेली रणनीती यावेळी कामी आली. 2019 मध्ये परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात त्याने यश मिळवले आणि संपूर्ण भारतातून 103 वा क्रमांक पटकावून तो IPS अधिकारी झाला.

अशी होती अभ्यासाची रणनिती
कार्तिकने अभ्यास करताना विशेष धोरणे अवलंबली. त्याने UPSC परीक्षेची सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून तयारी केली. अभ्यास करताना सतत उजळणी करण्याचा आग्रह धरला. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी त्याने मॉक टेस्ट सोडवण्यावर भर दिला आणि लेखन कौशल्यही सुधारले. याशिवाय त्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com