Career Success Story : मुलाला अधिकारी व्हायचं होतं; आईने शालेय पोषण आहार बनवून घर चालवलं; तीन कठीण परीक्षा पास करुन हा तरुण झाला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ही कथा आहे IAS अधिकारी (Career Success Story) डोंगरे रेवैय्या आणि त्यांच्या आईच्या संघर्षाची. डोंगरे रेवैया हे तेलंगणाचे रहिवासी आहेत. वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईने शालेय पोषण आहार तयार करुन पैसे कमावले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले. डोंगरे रेवैय्या यांनी एक, दोन नव्हे; तर भारतातील तीन कठीण परीक्षा पास केल्या आहेत. त्यांनी जेईई (JEE), गेट (GATE) आणि यूपीएससी (UPSC) परीक्षा पास होवून आपल्या आईचं नांव उज्ज्वल केलं आहे.

1500 रुपये पगारात घर चालवायचे (Career Success Story)
आई, दोन भाऊ आणि बहिणी असं डोंगरे रेवैय्या यांचे कुटुंब. लहान असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर डोंगरे रेवैय्याच्या आईने शाळांमध्ये माध्यान्ह भोजन तयार करण्यास सुरुवात केली. या कामाच्या मोबदल्यात त्यांना 1500 रुपये पगार मिळायचा. मुलांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. डोंगरे रेवैय्या यांना आईच्या कष्टाची पूर्ण जाणीव होती. या जाणिवेतून त्यांनी आईला चांगले आयुष्य देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
IIT मद्रासमध्ये मिळवला प्रवेश
डोंगरे रेवैया हे तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद येथील तुंगाडा गावचे रहिवासी आहेत. कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे त्यांना शहरात जाऊन शिक्षण घेता आले नाही. गावातीलच (Career Success Story) सरकारी शाळेतून त्यांनी 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना अभियंता व्हायचे होते आणि म्हणूनच 12वी नंतर त्यांनी इंजिनियरिंगसाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि IIT मद्रासमध्ये प्रवेश मिळवला.

फी भरण्यासाठी नव्हते पैसे
आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, डोंगरे रेवैया यांना फी भरण्यासाठी 20,000 रुपयांची कमतरता निर्माण झाली. त्याचवेळी तुंगडा गावातील गावकऱ्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अशोककुमार तेथे आले होते. यावेळी त्यांनी डोंगरे रेवैया यांची युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मद्रासची मार्कलिस्ट पाहिली. त्यांची कामगिरी पाहून IAS अशोक कुमार यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
ONGC मध्ये मिळाली सरकारी नोकरी
डोंगरे रेवैया यांनी 2017 मध्ये IIT मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम केला. यानंतर त्यांनी GATE परीक्षा उत्तीर्ण केली, जी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये त्यांचा क्रमांक 70 वा होता; त्यामुळे त्यांना मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये सरकारी नोकरी मिळाली. पण तो इथेच थांबला नाही. IAS अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे होते.

IAS होण्याचे स्वप्न पूर्ण
डोंगरे रेवैया यांनी लहानपणापासून आईचे कष्ट पाहिले होते म्हणूनच त्यांना आयएएस होऊन आपली आणि आईची सर्व स्वप्ने पूर्ण करायची होती. 2020 मध्ये, सरकारी नोकरीसोबत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2021 मध्ये परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना केवळ 2 मार्कने अपयश आले. त्यानंतर संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. जिद्दीने अभ्यास केला अन्  ते 2022 मध्ये 410 व्या क्रमांकासह IAS अधिकारी बनले.

UPSC मध्ये इतके मिळाले मार्क (Career Success Story)
डोंगरे रेवैया सध्या मसुरी येथील LBSNAA येथे IAS चे प्रशिक्षण घेत आहेत. डोंगरे रेवैया यांनी त्यांची UPSC मार्कशीट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांना निबंधात 115 गुण, GS 1 मध्ये 109, GS 2 मध्ये 99, GS 3 मध्ये 73, GS 4 मध्ये 117, पर्यायी गणित 1 मध्ये 143, पर्यायी गणित 2 (UPSC पर्यायी विषय) मध्ये 159 आणि Personality Test मध्ये 146 गुण मिळवले होते. त्यांच्या एकूण गुणांची बेरीज 961 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com