Career Success Story : 13 वर्षे अनाथालयात.. जिद्दीने घेतले शिक्षण; UPSC पास न करता असे झाले IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन | अब्दुल नासर यांनी वयाच्या (Career Success Story) अवघ्या 5 व्या वर्षी वडिलांना गमावलं. यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्षे आपल्या भावंडांसोबत अनाथाश्रमात घालवली. कठीण प्रसंगी वृत्तपत्रे विकून आणि शालेय मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांपैकी एक परीक्षा मानली जाते. कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि अनेक वर्षांच्या तयारीनंतर लाखो उमेदवारांपैकी काहींनाच अधिकारी पद गाठता येतं. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अनेक विद्यार्थी (Career Success Story) खासगी कोचिंग क्लासेसचा पर्याय निवडतात आणि भरघोस फी देखील भरतात. पण यापैकी मोजक्याच उमेदवारांना आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येतं. पण दुसरीकडे असं चित्र पहायला मिळतं की जे उमेदवार आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत अशा उमेदवारांना खासगी क्लासची फी भरणे परवडत नाही. तरीही हे विद्यार्थी सेल्फ स्टडीच्या जोरावर परीक्षेत बाजी मारतात. आयएएस अधिकारी बी अब्दुल नसार हे अशा विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. त्यांची यशोगाथा रंजक आहे. जाणून घेवूया बी अब्दुल नसार (IAS B Abdul Nasar) यांच्याविषयी….

UPSC परीक्षा न देता झाले IAS
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की IAS बी अब्दुल नसार यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती, तरीही ते IAS अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. हो हे खरे आहे! आता तुमच्या (Career Success Story) मनात असा प्रश्न आला असेल की परीक्षा न देता ते IAS कसे झाले? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

वयाच्या ५ व्या वर्षी वडिलांना गमावलं
बी अब्दुल नसार हे मूळचे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथील रहिवासी. ते पाच वर्षाचे असताना दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. याचा परिणाम असा झाला की, नसार (Career Success Story) आणि त्यांच्या भावंडांना अनाथाश्रमात राहावं लागलं. आयुष्यात अनेक आव्हाने समोर उभे असताना नसार यांनी केरळमधील एका अनाथाश्रमात एकूण 13 वर्षे घालवली आणि इथूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

पेपर विकले, शिकवण्या घेतल्या
आर्थिक गरजा भागवण्यासाठी वयाच्या 10 व्या त्यांनी क्लिनर आणि हॉटेल सप्लायर म्हणून काम केले. नंतर त्यांनी थलासरी येथील शासकीय महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अब्दुल नसार यांनी वृत्तपत्रे विकणे, शिकवणी देणे आणि फोन ऑपरेटर म्हणून काम करणे अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या करुन कुटुंबाला आधार दिला आणि शिक्षणही पूर्ण केले.

पहिल्यांदा झाले उपजिल्हाधिकारी झाले
1994 मध्ये नसार यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर केरळ आरोग्य विभागात सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. यानंतर समजाबद्दलची त्यांची बांधिलकी आणि कामातील मेहनत पाहून त्यांना हळूहळू पदोन्नती मिळाली आणि अखेरीस 2006 पर्यंत ते राज्य नागरी सेवेत उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचले.

असे झाले IAS (Career Success Story)
2015 मध्ये नसार यांना केरळचे सर्वोच्च उपजिल्हाधिकारी म्हणून ओळखले गेले, ज्यामुळे त्यांची 2017 मध्ये IAS अधिकारी पदावर पदोन्नती झाली. 2019 मध्ये कोल्लमच्या जिल्हाधिकाऱ्याची भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केरळ सरकारमध्ये गृहनिर्माण आयुक्त म्हणून काम केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com