Career Success Story : पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे 4 वाजता उठून कचरा वेचला; आज आहे परदेशी रेस्टॉरंटची ‘हेड शेफ’

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दोन वेळचं जेवण मिळण्याची मुश्किल… पोटाची (Career Success Story) खळगी भरण्यासाठी ती दिल्लीतील रस्त्यांवर कचरा वेचू लागली आणि आपल्या मेहनतीच्या बळावर आणि जिद्दीच्या बळावर तिने शिक्षण सुरूच ठेवले. तिने हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला खरं पण हे शिक्षण देखील तिला अर्ध्यात सोडावं लागलं. आता ही तरुणी दिल्लीत एका अत्यंत प्रसिद्ध अशा यूरोपियन रेस्टॉरंटची ‘हेड शेफ’ आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा तरुणीची कहाणी सांगणार आहोत, जी 4 वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलाचं निधन झालं होतं. यानंतर या धक्क्यामुळे मोठ्या बहिणीने आत्महत्या केली. घरात एकाच वेळी 3 लोकांच्या पाठोपाठ झालेल्या मृत्यूमुळे मोठा भाऊ नैराश्यात गेला आणि नशेच्या आहारी गेला. मात्र, तरीही या तरुणीने हिम्मत हारली नाही आणि तिने आपला प्रवास अथकपणे सुरूच ठेवला.

आधी आई-वडील आणि नंतर बहिणीला गमावलं (Career Success Story)
लीलिमा ख़ान (Lilima Khan) असं या तरुणीचं नाव आहे. ती डियर डोना रेस्टोरंटची हेड शेफ आहे. लीलिमाने केलेल्या संघर्षाची कहाणी सर्वांना प्रेरणा देणारी आहे. लीलिमाने लहान वयात अनेक कटू प्रसंगांचा सामना केला आहे. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ती फक्त 4 वर्षाची होती त्यावेळी तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. ती आपल्या दोन मोठ्या भाऊ आणि बहिणीसह राहू लागली. मात्र, तिच्या बहिणीनेही आत्महत्या केली. कुटुंबात एकापाठोपाठ 3 जणांच्या आकास्मित मृत्यूनंतर याचा परिणाम लिलिमाच्या विवाहित भावावर झाला. त्याला नैराश्याने ग्रासले आणि तो नशेच्या आहारी गेला.

भावाने घर विकले… बेघर झाली
नशेच्या आहारी गेलेल्या भावाने घर विकून टाकले. यानंतर (Career Success Story) चोरीच्या आरोपात त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे लिलिमा आणि तिचा 2 वर्षांचा लहान भाऊ एकटे पडले. काही दिवसांनी तिची काकू येऊन लहान भावाला सोबत घेऊन गेली. यानंतर ती एकटी पडली. घरात कुणीच नसल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेने तिला आश्रय दिला. त्याठिकाणी इतर अनेक मुलेही राहत होती; त्यांच्या सोबत लिलिमा राहू लागली.

पहाटे 4 वाजल्यापासून कचरा वेचायची (Career Success Story)
लिलिमा सांगते की, “झोपडपट्टीत राहणारी महिला सर्व मुलांना पहाटे 4 वाजता उठवायची आणि फ्रेंड कॉलनीत रस्त्यांवर कचरा वेचण्यास पाठवायची. या बदल्यात आम्हाला जेवण मिळत होते. मधल्या काळात भूक लागत असल्याने अनेकदा आम्हाला डस्टबिनमधून जेवण काढून खावे लागत होते. परिस्थिती अशी होती की अनेकदा रेड लाइट परिसरातही भीक मागावी लागत होती. पण, अशा सर्व परिस्थितीत एक सकारात्मक वळण माझ्या आयुष्याने घेतले.”

मावशीने मारहाण केली… सामाजिक संस्थेने आश्रय दिला
रस्त्यावरील मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या चेतना या एनजीओचे कार्यकर्ते प्रमोद यांना लीलिमा भेटली. यानंतर मग ती चित्तरंजन पार्कमधील एक अनाथालय, उदयन केअर याठिकाणी आली. याठिकाणी शिक्षणाची सुविधा होती. सर्व काही ठिक सुरू असताना अचानक तिची मावशी त्याठिकाणी आली आणि तिला तेथून घेऊन गेली. मात्र, तेथील वातावरण तिला आवडले नाही. मावशीच्या घरी तिला मारहाणही केली जात होती. त्यामुळे पुन्हा एकदा लीलिमा तिथून निघून गेली आणि यावेळी ती काश्मिरी गेट येथे असलेल्या किलकारी रेनबो होममध्ये पोहोचली. याठिकाणी तिने सुमारे 18 वर्षे येथे वास्तव्य केले आणि तिचे सर्व शिक्षण येथेच पूर्ण केले.

अशी बनली हेड शेफ
लीलिमाने सांगितले की, “किलकारी रेनबो होम याठिकाणी (Career Success Story) राहत असताना मला Creative Services Support Group (CSSG) याबाबत माहिती मिळाली. हा ग्रुप 18 वर्षांपेक्षा जास्त मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे या ग्रुपच्या मदतीने मला लोधी रोडवरील एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर मी अनेक हॉटेलमध्ये नोकरी केली. बराच काळ अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये काम केल्यानंतर मला डिअर डोना युरोपियन रेस्टॉरंटमध्ये हेड शेफची नोकरी मिळाली. माझा पहिला पगार हा फक्त 5000 रुपये होता. आज मी महिन्याला 65 हजार रुपये कमवत आहे आहे.” तिचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com