करिअरनामा ऑनलाईन। खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाची (Career Success Story) फार आवड आहे. शाळेत शिकत असताना अभ्यासातील तिची प्रगती दिवसेंदिवस उल्लेखनीय होत होती. दहावीमध्ये शिकत असताना तिने 90.40% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले होते. शालेय जीवनात गगनभरारी घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. असं स्वप्न पाहणारी एक चिमुरडी म्हणजे सिध्दी… जीने उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षातही उतरवले…
लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं
सिध्दी विकास घाडगे ही बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने भारतीय वायुदलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदाला गवसणी घातली आणि लहानपणीचं स्वप्न पूर्ण केलं. तिच्या यशात शाळेच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ आणि शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
एअर फोर्सच्या परिक्षेत केली उत्कृष्ठ कामगिरी
सिध्दी घाडगे हिने AFCAT (Air Force Common Entrance Test) व AFSB (Air Force Selection Board) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीत चमकदार कामगिरी केली. संपूर्ण भारतातून तिने गुणवत्ता यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. बालपणापासूनच तिने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सर्वांना प्रभावित केले होते. एवढंच नव्हे; तर प्राथमिक व माध्यमिक विभागात उत्कृष्ट विद्यार्थिनी, सलग तीन वर्षे उत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून शाळेने तीला सन्मानित केले आहे.
खेळातही मागे हटली नाही (Career Success Story)
बांबू उडी क्रीडा प्रकारात तिने राष्ट्रीय पातळीवर आणि पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राज्य पातळीवर तिने चमकदार कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रात तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेदरम्यान तिचा गौरव करण्यात आला होता.
होतोय कौतुकाचा वर्षाव
खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाचीही फार आवड आहे. अभ्यासातील (Career Success Story) तिची प्रगती उल्लेखनीय होती. इयत्ता दहावीमध्ये तिने ९०.४०% गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली होती. सिध्दीच्या यशात शाळेच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ व शाळेतील शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिचे पालक सांगतात.
सिद्धीने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही.प्रभुणे, सचिव अँड.नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यासह पालकांनी तिचे अभिनंदन केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com