Career Success Story : बस ड्रायव्हरच्या मुलीनं आकाश कवेत घेतलं; एअर फोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ पदावर झाली निवड

Career Success Story of Flying Officer Shruti Sinh
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात कितीही अडचणी येवूदे; तुम्ही (Career Success Story) जर तुमच्या जिद्दीवर ठाम असाल तर हवं ते ध्येय गाठता येतं.  उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका बस ड्रायव्हरच्या मुलीने आकाश कवेत घेतलं आहे. तिच्या या कामगिरीतून  अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रुतीने भारतीय वायुसेनेची परीक्षा दिली आणि मोठं यश मिळवलं आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी…

सामान्य कुटुंबातील श्रुती
केपी सिंह यांची मुलगी श्रुती. श्रुतीचे वडील यूपी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. एका सामान्य कुटुंबातील श्रुतीची भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदावर निवड झाली आहे. अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर श्रुतीने एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) या प्रवेश परीक्षेत  संपूर्ण देशातून दूसरा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. श्रुतीच्या यशाने सर्वजण भारावून गेले आहेत. शिवाय सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे.

पुढील प्रशिक्षणासाठी सज्ज (Career Success Story)
श्रुती सिंग मेरठ येथील पल्लव पुरम भागात राहते. 2023 मध्ये झालेल्या एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट या प्रवेश परीक्षेत तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या परिक्षेत तिला AIR 2 मिळाली आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी ती हैदराबाद येथील वायुसेना अकादमीमध्ये तिचे प्रशिक्षण सुरु करणार आहे. फ्लाइंग ऑफिसर हे भारतीय हवाई दलात एक सन्मानाचे पद मानले जाते.

श्रुती यशाचं श्रेय यांना देते
या यशाचे श्रेय श्रुती तिच्या आई-वडिलांना देते. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रेरणा दिली असं ती म्हणते. तसेच आपल्या यशाचे श्रेयही तिने आपल्या सर्व प्रियजनांना दिले आहे. शिवाय श्रुतीने तिचे संपूर्ण यश तिचे गुरू कर्नल राजीव देवगण यांना समर्पित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने (Career Success Story) सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीची तयारी केली. शेवटी भारतीय वायुसेनेच्या परीक्षेत संपूर्ण भारतात 2 राक्रमांक  मिळाल्याने श्रुती आनंदी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com