करिअरनामा ऑनलाईन । श्रेष्ठा ठाकूर पोलीस अधिकारी होण्यामागे (Career Success Story) मोठी कथा आहे. श्रेष्ठा यांचे म्हणणे आहे की, त्या कानपूरमध्ये शिकत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा विनयभंग करण्याचा दोनवेळा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी जशी कारवाई करायला हवी होती तशी कारवाई केली नाही. या घटनेनंतर श्रेष्ठाच्या आयुष्यात यू-टर्न आला आणि तिच्या मनात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली. मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधमांना धडा शिकवता यावा; यासाठी त्यांना पोलिस अधिकारी बनायचं होतं. या इच्छेला त्यांनी मूर्त स्वरुप दिले आणि कठोर मेहनतीने त्या पोलिस अधिकारी बनल्या. करिअर, लग्न, आयुष्यात आलेले उतार चढाव.. एकूणच श्रेष्ठा यांचा प्रवास कसा होता याविषयी आपण जाणून घेणार आहोत….
श्रेष्ठा ठाकूर (Shreshtha Thakur DSP) या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आहेत. धडाकेबाज कारवायांमुळे त्या राज्यात ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये बुलंदशहर जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्या पहिल्यांदाच चांगल्याच प्रकाशझोतात आल्या. कारण होते; श्रेष्ठा यांचा एका राजकीय नेत्याशी वाद झाला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
भावाच्या पाठिंब्यामुळे यश मिळवता आले (Career Success Story)
श्रेष्ठा यांचे वडील एस. बी. सिंह भदौरिया हे प्रसिध्द व्यापारी आहेत. श्रेष्ठा यांना दोन मोठे भाऊ आहेत. श्रेष्ठा ठाकूर या त्यांच्या यशात मोठा भाऊ मनीष प्रताप यांचा मोठा वाटा असल्याचं सांगतात. त्या सांगतात, की त्यांच्या मोठ्या भावाने PPS सारखी कठीण परीक्षा देत असताना सतत त्यांचे मनोबल वाढवले. श्रेष्ठा ठाकूर या महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देतात. मुलींना शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी त्या तायक्वांदोचे प्रशिक्षणही देतात. त्या ज्या जिल्ह्यात तैनात आहेत त्या जिल्ह्यातील गुन्हेगारांना त्यांची भीती वाटते.
गतिमान अधिकारी म्हणून झाली निवड
श्रेष्ठा यांनी कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासाच्या दिवसात रस्त्यावरील विक्रेत्यांकडून त्यांचा दोनवेळा विनयभंग झाला. त्यांनी पोलिसात तक्रार केली असता योग्य कारवाई झाली नाही. या घटनेने श्रेष्ठा ठाकूर यांच्या मनात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली. एकना एक (Career Success Story) दिवस मी पोलीस अधिकारी होईन आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कडक कारवाई करेन; असा त्यांना ठाम विश्वास होता. श्रेष्ठा यांनी मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले. 2012 मध्ये त्या यूपी पीसीएस (UP PCS) परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या पोलीस दलात रुजू झाल्यानंतर, त्यांची जलद कृती आणि प्रकरणे सोडवण्याची तार्किक क्षमता यामुळे त्यांची गणना उत्तर प्रदेशातील गतिमान अधिकाऱ्यांमध्ये होऊ लागली.
पतीने IRS अधिकारी असल्याचे भासवून लग्न केले
2018 मध्ये, श्रेष्ठा ठाकूरने बिहारच्या नवादा येथील रहिवासी असलेल्या रोहित राज सिंहसोबत लग्न केले. रोहितने स्वतःला आयआरएस अधिकारी असल्याचे सांगून लग्न केले होते. त्यानंतर रोहितने खोटे बोलून श्रेष्ठाशी लग्न केल्याचे उघड झाले. लग्नाच्या दोन वर्षानंतर श्रेष्ठने रोहितला घटस्फोट दिला. रोहित राज त्याच्या माजी पत्नीच्या नावावर लोकांची फसवणूक करायचा. याबाबत श्रेष्ठ यांनी गाझियाबादच्या कौशांबी पोलिस ठाण्यात रोहितविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाजपच्या एका नेत्याशी वाद अन् तडका फडकी बदली (Career Success Story)
बुलंदशहर येथे तैनात असताना, हेल्मेट न घातल्याबद्दल श्रेष्ठा ठाकूर यांनी एका भाजप नेत्यावर कारवाई केली होती. हे प्रकरण इतके गंभीर झाले की बुलंदशहर येथील न्यायालयासमोर भाजप नेते आणि श्रेष्ठा ठाकूर यांच्यात हाणामारी झाली. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण राजधानी लखनौपर्यंत पोहोचले. यानंतर श्रेष्ठ ठाकूर यांची बहराइच येथे तडका फडकी बदली झाली.
भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या
डीएसपी श्रेष्ठा ठाकूर यांना कुत्रे खूप आवडतात. त्या ती घरातून अन्न शिजवून रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालताना अनेकवेळा दिसल्या आहेत. श्रेष्ठा यांनी सांगितले की, एकदा कानपूरमध्ये कॉलेजला जात असताना त्यांनी एका लहान मुलाला भीक मागताना पाहिले आणि त्याला टिफिन दिला. आजही त्या गरजू मुलांना मदत करत असतात. 2017 मध्ये श्रेष्ठा ठाकूर एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. बहराइचहून लखनौला सरकारी कामासाठी निघालेल्या श्रेष्ठा यांच्या गाडीला रोडवेजच्या बसने धडक दिली होती. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com