करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही स्त्रीसाठी घर सांभाळत (Career Success Story) अभ्यास करणे सोपे नाही. परंतु काही लोक असे आहेत की त्यांच्या मार्गावर कोणतीही समस्या आली तरी ते त्यांचे ध्येय सोडून लांब पळत नाहीत. आज आम्ही त्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत, जिची सलग दोनवेळा उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. 31 वर्षीय सिम्मी यादव यांची कहाणी तुम्हाला हेच शिकवेल की तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करु शकता.
संसार सांभाळत दिली स्पर्धा परीक्षा
सिम्मी यादव मध्य प्रदेश राज्यातील इंदूरच्या रहिवासी आहेत. 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांचा लग्नानंतर खडतर (Career Success Story) प्रवास सुरु झाला. लग्नानंतर त्यांनी घर सांभाळण्यासोबतच नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची एमपीपीएससी (MPPSC) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. सिम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “माझे 2016 मध्ये लग्न झाले. माझ्या लग्नाच्या एका वर्षानंतर मी राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि सर्व कौटुंबिक आव्हानांना न जुमानता माझे पती राहुल यादव यांनी मला यामध्ये पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे मला हे यश मिळाले.”
पतीच्या पाठिंब्यामुळं यश मिळवता आलं (Career Success Story)
सिम्मी यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी पदवी घेतली आहे. नागरी सेवा परीक्षेत मिळवलेल्या यशाचे श्रेय देताना त्या सांगतात; “लग्नानंतर माझ्या पतीने मला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला असता, तर मी त्यांचा सल्ला मान्य केला असता, कारण माझ्यासाठी कौटुंबिक मूल्यांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पण मी स्पर्धा परीक्षा देवून करिअर करावं अशी माझ्या पतीची इच्छा होती. परीक्षेच्या तयारीदरम्यान असे अनेक प्रसंग आले की पतीने मला अगदी स्वयंपाकात देखील मदत केली आहे. त्यांच्याच सहकार्यामुळे मला इथपर्यंत पोहचता आलं आहे.”
“…सिम्मीने कलेक्टर व्हावं”
सिम्मीचे पती राहुल यादव चेन्नई येथील एका आयटी (Career Success Story) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ते म्हणाले, “माझ्या पत्नीची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड होईल; असा मला विश्वास होता. आता एक दिवस तिनेही जिल्हाधिकारी व्हावे; अशी माझी मनापासून इच्छा आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com