Career Success Story : 8 तासाच्या वकिलीनंतर 7 तास सेल्फ स्टडी; वकील ते CA.. असा आहे प्रदीप यांचा प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहित आहे (Career Success Story) की शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. एखाद्याने जर मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा झुमरी तलैयाचे रहिवासी प्रदीप हिसारिया (CA pradeep Hisaria) यांची कामगिरी जगासमोर आली. हा 49 वर्षांचा तरुण अचानकपणे तमाम तरुण वर्गासाठी एक मिसाल बनले आहेत. याचं कारण म्हणजे या वयात कौटुंबिक जबाबदाऱ्या पर पाडून आणि कायद्याची प्रॅक्टिस सुरू ठेवून प्रदीप CA झाले आहेत. शालेय वयात CA होण्याचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. ही किमया त्यांनी कशी केली याबद्दल जाणून घेवूया…

CA ची तयारी दोनवेळा अर्ध्यात सोडली
प्रदीप हिसारिया हे 1993 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेची तयारी सुरू केली. पण, आर्थिक अडचणींमुळे त्यांना परीक्षेची तयारी अर्धवट सोडावी लागली. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली, मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना पुन्हा एकदा CA ची तयारी अर्ध्यात सोडावी लागली.

ट्रेनच्या प्रवासात सुचली कल्पना (Career Success Story)
ही गोष्ट 2021 मधील आहे. प्रदीप हिसारिया सीए परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या मुलाला रेल्वेने राजस्थानला घेऊन जाणार होते. दिवसभराच्या रेल्वे प्रवासात त्यांनी एकदा त्यांच्या मुलाच्या पुस्तकांचे निरीक्षण केले. यानंतर त्यांच्या मनात सीएची तयारी करण्याची इच्छा पुन्हा एकदा जागृत झाली. यानंतर प्रदीप यांनी आपले अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि सीएची तयारी पुन्हा सुरू केली.

8 तास ड्युटी आणि 7 तासाचा सेल्फ स्टडी
प्रदीप हिसारिया हे आधी प्राप्तिकर आणि जीएसटी वकील म्हणून काम करत होते. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयात कामकाज करणे हा प्रदीप यांचा (Career Success Story) नित्यक्रम होता. हे करत असताना त्यांनी सीएची तयारी सुरु केली. यासाठी त्यांनी आपले सामाजिक जीवन मर्यादित ठेवले होते. सकाळी 5 ते 9 घरी अभ्यास करून ते ऑफिसला जायचे. त्यानंतर संध्याकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत ते सीएच्या तयारीसाठी अभ्यास करायचे. वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि सेल्फ स्टडीमुळे त्यांना परीक्षेत यशस्वी होता आलं; असं ते सांगतात. प्रदीप यांचा मुलगा सीएच्या अंतिम वर्षाला आहे; तर मुलगी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे.

30 वर्षांनी स्वप्न झाले साकार
प्रदीप हिसारिया यांनी 12वी पूर्ण केल्यानंतर 30 वर्षांनी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आयुष्यात मनासारखे करिअर घडवत असताना गंतव्य स्थान बदलणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे; असे त्यांचे मत आहे. त्यांचे यश त्या सर्व लोकांसाठी प्रेरणा आहे जे काही कारणास्तव आपली स्वप्ने अपूर्ण ठेवतात. कष्ट (Career Success Story) आणि जिद्द याने कोणत्याही वयात यश मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही काम अवघड असले तरी अशक्य नाही; हे प्रदीप यांच्या कथेतून दिसून येते. त्यांचे आयुष्य आणि त्यांनी मिळवलेले यश हे समाजासाठी आणि तरुण वर्गासाठी निश्चित प्रेरणादायी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com