Career Success Story : IIT मधून शिक्षण.. टाटा समूहात इंटर्नशिप.. तीन मित्रांनी उभारला स्टार्ट अप; आज आहेत मालामाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे (Career Success Story) आहेत ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सुरुवातीला टाटांच्या कंपनीत इंटर्नशीप केली आणि आता त्यांनी आपल्या मित्रांसोबत लोकप्रिय राइड-हेलिंग स्टार्टअप, रॅपिडो, सुरू केला आहे. जाणून घेवूया त्यांची प्रेरणादायी प्रवासविषयी….

टाटांच्या कंपनीत केली इंटर्नशीप (Career Success Story)
अरविंद सांका (Arvind Sanka) यांनी आयआयटी मधून पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी टाटा कंपनीत इंटर्नशिप सुद्धा केली. इंटर्नशिप नंतर त्यांनी मित्रांसह राइड-हेलिंग स्टार्टअप रॅपिडो सुरू केले. २०१५ मध्ये हैदराबाद येथून या स्टार्टअपची सुरुवात झाली. या कंपनीला नुकतेच १२० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे १,००० कोटी रुपये गुंतवणूक मिळाली, ज्यामुळे आता रॅपिडो युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहे.

अरविंद सांका यांचा करिअर ग्राफ असा आहे
आयआयटी भुवनेश्वर (IIT Bhuvaneshwar) येथून कॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक. ची पदवी घेतल्यानंतर अरविंद सांका यांनी टाटा मोटर्समध्ये इंटर्न म्हणून काम सुरु केले. यानंतर त्यांनी फ्लिपकार्टमध्ये सप्लाय चेन फायनान्स बिझनेस पार्टनर म्हणून काम केले. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी TheCareer ची सह-स्थापना केली तर २१०५ मध्ये पवन गुंटुपल्ली आणि ऋषिकेश एसआर यांच्यासोबत रॅपिडो सुरू केले.
अरविंद सांका यांचे सहकारी पवन गुंटुपल्ली एक (Career Success Story) आयआयटीयन आहेत तर, ऋषिकेश एसआर PESU चे माजी विद्यार्थी आहेत. आयुष्यात उंच भरारी घेण्यास संकोच करणाऱ्या अनेकांसाठी अरविंद सांका यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

रॅपीडो ठरला युनिकॉर्न स्टार्टअप
यावर्षी युनिकॉर्नचा मान मिळवणारा रॅपीडो तिसरा (Career Success Story) स्टार्टअप ठरला आहे. यापूर्वी, भाविश अग्रवालचे क्रुट्रिम आणि परफिओस युनिकॉर्न घोषित करण्यात आले होते. रॅपिडोचे एकूण मूल्यांकनही एक अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले असून रॅपिडो ही उबर, ओला, नम्मा यात्री या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com