Career Success Story : डिलिव्हरी बॉय ते जगातील श्रीमंत बिझनेसमॅन… आईच्या आपमानाने आयुष्याची दिशाच बदलली

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मजूर दाम्पत्याचा गरीब मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला ‘जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

करिअरनामा ऑनलाईन । शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक (Career Success Story) यशोगाथा आपण वाचल्या आहेत. तुमचा निश्चय दृढ असेल आणि मनगटामध्ये दहा हत्तीचे बळ असेल तर नशीबही तुमच्यापुढे झुकते हे खरं आहे. परिश्रमासमोर अत्यंत कठीण प्रसंगही नतमस्तक होतो; हे अगदी खरं आहे. असेच एक उदाहरण आहे अमानसियो ऑर्टेगा (Amancio Ortega) यांचे…. ऑर्टेगा यांचे नाव कमीच लोकांना माहिती असेल पण त्यांनी मिळवलेलं यश जगप्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया अमानसियो यांच्याबद्दल; ज्यांनी जन्मतः गरिबी पाहिली; पण मेहनतीच्या जोरावर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

कोण आहेत अमानसियो ऑर्टेगा?
स्पेनच्या लिओन या छोट्याशा गावात २८ मार्च १९३६ रोजी अमानसियो ऑर्टेगा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी म्हणून काम करत होते तर वडिलांसोबत त्यांची आई देखील मोलकरीण म्हणून राबत होती. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अमानसियो शिक्षणही पूर्ण करू शकले नाही. कुटुंबाला आपल्या (Career Success Story) हातभाराची गरज आहे; हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि ते पैसे मिळवण्यासाठी काम करू लागले. वयाच्या १३ व्या वर्षी अमानसियो फॅशन टेलरसाठी काम करू लागले जे श्रीमंत ग्राहकांचे कपडे शिवायचे. इथूनच गारमेंट फॅशनसाठी अमानसियो यांची आवड वाढत गेली.

रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागले
अमानसियो फारकाळ या शहरात राहू शकले नाहीत. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब शहर सोडून नवीन रोजगाराच्या शोधात ए कोरुना येथे पोहोचले. इथे त्यांच्या वडिलांना नोकरी मिळाली पण अमानसियो यांनी वस्त्रोद्योग सोडला नाही आणि अ कोरुना येथील स्थानिक ‘गाला’ शर्टच्या दुकानात त्यांनी नोकरी पकडली. विशेष म्हणजे पूर्वी जिथे होते त्याच ठिकाणी हे दुकान अजूनही असून इथूनच अमानसिओ यांनी इटालियन फॅशन डिझायनरकडून कपडे शिवण्याची कला शिकली. काही वर्षांनंतर ला माझा हॅबरडाशेरी येथे त्यांना विक्री सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली तर 1960 च्या दशकात अमानसियो शहरातील एका दुकानाचे ते व्यवस्थापक बनले.

आईच्या अपमान जिव्हारी लागला (Career Success Story)
लहानपणी अमानसिओ यांना आपल्या वडिलांप्रमाणे रेल्वे कामगार व्हायचं होतं. एक दिवस शाळेतून घरी परताना आईला एक दुकानदार उधारीवर माल देत नसल्याचं त्यांनी पाहिलं. त्यावेळी अमानसिओ यांना ते अपमानकारक वाटलं तिथूनच त्यांनी शाळा सोडून पैसे कमावण्यासाठी मिळेल ते काम करायचं ठरवलं. अमानसिओ यांच्या आईला उधारीवर रेशन देण्यास नकार देण्याच्या दुकानदाराचे नाव ‘गाला’ होते जिथे त्यांनी सर्वप्रथम नोकरी केली.

जगातील सर्वात मोठ्या फॅशन ब्रँडणे जन्म घेतला
अमानसियो यांनी शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने डिलिव्हरी बॉयचं काम हातात घेतलं. १९७५ मध्ये सर्वप्रथम ‘झोब्रा’ नावाने अमानसियो यांनी आपला स्वतःचा ब्रँड सुरू केला पण भविष्यात काही वाद निर्माण व्हायला नको म्हणून त्यांनी ‘झारा’ (ZARA) असं या ब्रॅंडचं नामकरण केलं. झाराने गेल्या १९ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली असून या कालावधीत कंपनीला एकदाही तोटा झाला नाही.

‘Zara’ फॅशन ब्रँडने झेप घेतली
अमानसियो वेळ मिळेल तेव्हा स्वतःच कपडे शिवायचे आणि कमी पैशात विकायचे. त्यांचे डिझाईन लोकांना आवडू लागले आणि कपड्यांचा खपही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मार्केटमध्ये मागणी (Career Success Story) वाढल्यावर बेरोजगार महिलांना सोबत घेत त्यांनी फॅशन ब्रँडचा व्यवसाय उभा केला. अमानसियो यांनी एक छोटी कंपनी सुरु केली होती आणि फक्त बुद्धी चातुर्याने त्यांनी व्यवसाय एक मोठा ब्रँड बनवला.

अन बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अमानसियो यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि 2016 मध्ये प्रथमच एक सामान्य रेल्वे कामगाराचा मुलगा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. 2016 मध्ये त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. २०२४ मध्ये त्यांची एकूण संपत्ती 10,710 कोटी यूएस डॉलर्स एवढी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com