Career Success Story : जिंकलस!! शिक्षणासाठी रिक्षा विकलेल्या वडिलांची लेक झाली ‘अग्निवीर’; Indian Navy मध्ये लवकरच होणार सामील 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकारच्या अग्निपथ योजनेला (Career Success Story) देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला उमेदवार अग्निवीर भरतीसाठी आग्रही आहेत. या भरतीमध्ये एका रिक्षा चालकाच्या मुलीने इतिहास रचला आहे. ही मुलगी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर छत्तीसगडची पहिली महिला अग्निवीर झाली आहे. हिशा बघेल असं या मुलीचं नाव आहे. ती मूळची छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावची रहिवासी आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती 2023 मध्ये तिने भाग घेतला होता. ज्यामध्ये तिची निवड झाली. आता हिशा ओडिशातील चिल्का येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

Agniveer Hisha Baghel

गावकऱ्यांमध्ये आनंदी आनंद

मार्चपर्यंत भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती महिला अग्निवीर म्हणून देशाचे रक्षण करेल. तिच्या या कामगिरीने केवळ तिचे कुटुंबीयच नाही तर गावकरीही खूश आहेत. हिशाला शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकाने सांगितले की, गावातील शाळेत शिकल्यानंतर (Career Success Story) हिशाने उतई कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. जिथून ती पहिली एनसीसी कॅडेट बनली. सरकारने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर हिशाने अग्निवीर भरती होण्यासाठी तयारी सुरु केली. तिच्या या यशाबद्दल तिचे शिक्षकही आनंद व्यक्त करत आहेत.

Agniveer Hisha Baghel
फिटनेस पाहून झाली निवड (Career Success Story)

मुलीच्या यशाबद्दल बोलताना हिशाची आई सती बघेल म्हणाल्या, “माझ्या धाकट्या मुलीने गावातील मैदानात तरुणांसोबत एकट्याने धावण्याचा सराव सुरू केला. सप्टेंबर 2022 मध्ये तिने अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात भरतीसाठी अर्ज केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी फिटनेस पाहून (Career Success Story) तिची निवड केली. देशाच्या रक्षणाची शपथ घेऊन सैन्यात भरती होण्याची बरीच तयारी तिने केली. मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. ती खूप मेहनती आहे. ट्रेनिंगसाठी ती पहाटे 4 वाजता उठायची.”

Agniveer Hisha Baghel
पतीच्या उपचारासाठी जमीन आणि रिक्षा विकावी लागली

हिशाच्या आईने सांगितले की, “आम्ही आमची जमीन (Career Success Story) आणि रिक्षा विकून ते पैसे माझ्या पतीच्या उपचारासाठी वापरले. हिशाच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. त्यांचे उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही आमची रिक्षा विकण्याचा निर्णय घेतला.

Agniveer Hisha Baghel
शासनाकडून मदतीची अपेक्षा

हिशाची आई पुढे म्हणाली, “आम्हाला आशा आहे की आता आम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल.’ त्यांनी सांगितले की, हिशाचे वडील गेल्या 12 वर्षांपासून (Career Success Story) कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीसह रिक्षाची विक्री आम्हाला करावी लागली. आमच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी;” अशी अपेक्षा सती बघेल यांनी व्यक्त केली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com