करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का? गुगल सारख्या (Career Success Story) कंपन्यांमध्ये किती पगार मिळतो? इथल्या पगाराचे आकडे आपल्या कल्पनेपलीकडील असतात. त्यामुळेच गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचं आकर्षण अनेक तरुणांना असतं. एका तरुणीवर गूगलने अक्षरशः पैशाचा पाऊस पाडलाय. B. Tech मधून इंजिनिअरिंग केलेल्या उत्तर प्रदेशच्या आराध्या त्रिपाठीला गुगलकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. सध्या आराध्या त्रिपाठी ही तिच्या MMMUT युनिव्हर्सिटीमधली सगळ्यात जास्त पॅकेज घेणारी विद्यार्थिनी ठरली आहे. ती सध्या खूप चर्चेत आहे. आराध्याला गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे. तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही एवढं विक्रमी पॅकेज गूगलने आराध्याला ऑफर केलं आहे.
सर्वाधिक पॅकेज घेणारी विद्यार्थिनी
आराध्या त्रिपाठी ही मदन मोहन मालवीया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी आहे. आराध्या त्रिपाठीला गुगलकडून नोकरीची ऑफर आली आहे. तिला अमेरिकन (Career Success Story) टेक जायंटकडून 52 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आराध्या त्रिपाठी ने MMMUT मधून Computer Engineering मध्ये B. Tech केलंय. तिला मिळालेले पॅकेज हे MMMUT मध्ये मिळालेले आत्तापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे. आराध्याला गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे.
वडील वकील तर आई गृहिणी (Career Success Story)
आराध्या त्रिपाठी ही उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिचे वडील अंजनी नंदन त्रिपाठी हे गोरखपूरच्या सिव्हिल कोर्टात वकील आहेत, तर आई गृहिणी आहे. आराध्या त्रिपाठी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. शालेय शिक्षणानंतर आराध्या त्रिपाठी MMMUT मध्ये B. Tech करण्यासाठी गेली आणि तिथूनच तिच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला.
आधी मिळालं होतं 32 लाखाचं पॅकेज
आराध्या त्रिपाठीने स्केलर अकॅडमी मधून इंटर्नशिप (Career Success Story) केली आहे. या इंटर्नशिप नंतर तिला स्केलरकडून 32 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले होते. पण आता तिला गुगलकडून चांगली ऑफर मिळाली असल्यामुळे तिने स्केलरची ऑफर नाकारली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com