करिअरनामा ऑनलाईन । काही कंपन्यांमध्ये नियम इतके कडक असतात (Career News) की प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काम करत असताना शिफ्ट संपेपर्यंत जागेवरून उठता सुद्धा येत नाही. ऑफिसमध्ये बॉसचे दडपण इतके असते की एखादा महत्वाचा फोन आल्यास त्या कर्मचाऱ्याला फोन घेताना दडपण येते. पण काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मध्य प्रदेशातील एका IT कंपनीने असाच प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिथले कर्मचारी अत्यंत सुखी आहेत.
या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने स्क्रीनशॉट शेअर केला. त्यावर लिहिले आहे, “तुमची शिफ्ट टाइम संपली आहे. 10 मिनिटांत कार्यालयीन (Career News) यंत्रणा बंद होईल. प्लीज घरी जा.”
याशिवाय या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास संपल्यानंतर त्यांना कोणतेही फोन कॉल किंवा ईमेल येणार नाहीत; याची काळजी कंपनीकडून घेतली जाते. आपल्या कर्मचाऱ्यांना (Career News) आनंदी वाटावे आणि त्यांच्याकडे उत्तम कार्यक्षमता असावी; अशी कंपनीची इच्छा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com