करिअरनामा ऑनलाईन | दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्रामपंचायत (Career News) कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदांच्या भरतीमध्ये आरक्षण नको,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारांत आरक्षण दिले असून, आणखी एका आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भूमिका विद्यार्थी मांडत आहेत.
दहा वर्षे सेवा झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सरळसेवा भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधीच 10 टक्के असलेले (Career News) अनुकंपा आरक्षण 20 टक्क्यांवर नेल्याने आरक्षणात वाढ झाली आहे. शिवाय जातीय आरक्षणही आहेच. अशा वेळी सरकारकडून केवळ 50 ते 60 टक्के पदांसाठीच जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याची भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
आंदोलनाचा इशारा (Career News)
‘दिवसेंदिवस अनेक प्रकारची आरक्षणे सरकारकडून दिली जात आहेत. दहीहंडी आणि इतर प्रकारच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही आहे. अशा प्रकारचे तथ्य नसलेले आरक्षण दिल्यास वर्षानूवर्षे जीवतोड अभ्यास करणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थांना जागाच उपलब्ध होणार नाहीत, म्हणून तातडीने हे आरक्षण रद्द करावे; अन्यथा आंदोलन केले जाईल,’ असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसह अनेक विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.
अनुकंपा आरक्षण 5 टक्के करावे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आरक्षण रद्द करावे; तसेच अनुकंपाधारकांना दिलेले वीस टक्के आरक्षण रद्द करून फक्त पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. कोणत्याही (Career News) उमेदवाराला स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय नोकरीची खैरात वाटण्यात येऊ नये, असे आवाहनही विद्यार्थ्यांनी सरकारला केली आहे.
सरकारने घेतलेला हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभारू; असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com