Career News : राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सरकारी पदांसाठी MPSC मार्फत होणार भरती

Career news
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। काही महिन्यांआधी राज्यात सत्ता परिवर्तन झालं. यानंतर नवीन मंत्रिमंडळही आलं. मात्र (Career News) गेले कित्येक वर्ष विद्यार्थ्यांना आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या समस्या मात्र तशाच प्रलंबित होत्या. सत्तेत आल्यानंतर आता नवीन राज्य सरकारनं निर्णयांचा आणि घोषणांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रीमंडळाने आता सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदं आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत असा निर्णय आज राज्य सरकाराच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे अशांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

आतापर्यंत क्लर्कची वर्ग 3 ची पदं ही MPSC मार्फत भरण्यात येत नव्हती. यासाठी स्वतंत्र भरती घेण्यात येत होती. मात्र आता ही सर्व पदं MPSC मार्फत भरली जाणार असल्यामुळे भरती परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही आणि मेहनती उमेदवारांना यात नोकरीची संधी मिळेल.

आणखी महत्त्वाचे निर्णय – (Career News)

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात आता सर्टिफिकेशन कोर्सेस सुरु करणार असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तसंच पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजाला 28 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com