करिअरनामा ऑनलाईन । जगभरात मंदीचे सावट घोंगावत आहे. जागतिक (Career News) मंदीमुळे टेक आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्यात आली आहे. या नोकर कपातीमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण सध्या दुसरीकडे वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जागतिक मंदीच्या वातावरणात काही क्षेत्र त्याला अपवाद ठरत आहेत. ब्लू कॉलर (Blue Collar) आणि ग्रे कॉलर जॉब्सची (Gray Collar Jobs) संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी 4 पटीने वाढली आहे. क्वेस कॉर्पची उपकंपनी बिलियन करियर्सने याविषयी अहवाल दिला आहे.
2022 मध्ये सर्वाधिक नोकऱ्या दिल्या (Career News)
ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर कंपन्यांनी गेल्या वर्षी सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत. या कंपन्यांमध्ये डिजिटायझेशन, ऑटोमेशन आणि न्यू वर्क मॉडलचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे (Career News) सर्वच कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.
एका अहवालानुसार, 2021 मध्ये ब्लू आणि ग्रे कॉलरसाठी 26,26,637 इतक्या कामगारांची आवश्यकता होती. तर 2022 मध्ये ही संख्या वाढली. गेल्या वर्षी 1,05,42,820 इतक्या (Career News) कुशल मनुष्यबळाची गरज पडली. म्हणजे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.
डाटानुसार, ब्लू आणि ग्रे या सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या 236 टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील कंपन्यांनी कुशल कामगारांना नोकरी देण्यावर (Career News) भर दिला आहे. कंपन्यांचे उत्पादन आणि क्षमता वाढीसाठी कुशल कामगारांच्या भरतीवर भर देण्यात येत आहे.
भारतात ‘या’ शहरात वाढली मागणी
अहवालात भारतातील कोणत्या शहरात ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर वर्कर्सची मागणी वाढली आहे. त्याची माहिती देण्यात आली आहे. भारतातील (Career News) प्रमुख महानगरातील आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे. त्यात या दोन्ही सेगमेंटमधील नोकऱ्या वाढल्याचे दिसते.
ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर कामगाऱ्यांच्या संख्येत 11.57 टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळुरुमध्ये 11.55 टक्के, मुंबईत या सेगमेंटमध्ये 10.21 टक्के कामगारांची मागणी वाढली आहे. हैदाराबादमध्ये 7.78 टक्के तर पुण्यात कुशल कामगारांच्या मागणीत 5.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Blue Collar आणि Grey Collar Worker म्हणजे काय?
Blue Collar Worker हे कुशल कामगार असतात. उत्पादन, वेअर हाऊस, खाणकाम या सारख्या क्षेत्रात या कामगारांची आवश्यकता असते. तर Grey Collar Worker हे सेवानिवृत्त (Career News) कर्मचारी असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा कंपन्यांना होतो. विविध पदावर हे लोक काम करतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com