करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, “सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना शारीरिकरित्या कार्यालयात येण्याचे आवाहन केले जाईल. त्यांनी घरून काम करू नये. तसेच (Career News) आता घरून काम करण्याचा नियम सर्वसाधारणपणे लागू होऊ दिला जाणार नाही;” अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेत भाजप खासदार रंजनबेन धनंजय भट्ट आणि खासदार श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोविड-19 महामारीच्या काळात कार्यालयात सामाजिक अंतराची (Social Distance) अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने मध्यम तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. साथीच्या आजारावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांनी आता (Career News) कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून घरातून काम करण्याचा नियम जवळपास सर्वच क्षेत्रात लागू करण्यात आला होता. आता कार्यालयात परतीचा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com