Career Mantra : हे आहेत देशातील टॉप 5 हटके कोर्स; चहाची चव चाखण्यापासून स्पा मॅनेजमेंट पर्यंत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही विचारही करणार नाही इतक्या वेगवेगळ्या (Career Mantra) पद्धतीचं शिक्षण भारतात दिलं जातं. कठपुतलीचा खेळ शिकणं असो किंवा इथिकल हॅकिंग ट्रेनिंग असो, हे सगळं भारतात शिकवलं जातं. आज आम्ही तुम्हाला भारतात शिकवल्या जाणाऱ्या काही हटके कोर्सेसबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही कठपुतली शिकण्याची पदवी मिळवू शकता? किंवा चहाची चव चाखून तुम्ही पैसे कमवू शकता? हे सर्व करिअर ऑप्शन्स आहेत, ज्यांचा अभ्यास आपल्या देशात केला जातो. आज अशाच काही विचित्र कोर्सेसविषयी जाणून घेऊयात, जे आपल्या देशातील विद्यापीठांमध्ये शिकवले जातात.

1. स्पा मॅनेजमेंट – (Career Mantra)

तुम्ही कधी विचार केला आहे का की स्पा कंपन्यांना सर्वोत्तम मसाजर आणि थेरपिस्ट कुठून मिळतात? वास्तविक, देशभरात अशा अनेक संस्था आहेत, ज्या स्पा मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. कोर्सदरम्यान, आपल्याला स्पा शी संबंधित बारकावे शिकवले जातात. तसेच मसाज करण्याच्या टेकनिक्स सुद्धा सांगितल्या जातात.

2. कठपुतली –

कठपुतली ही जगातील सर्वात जुनी मनोरंजन पद्धती आहे. या माध्यमातून केवळ कठपुतलीचा खेळ नाही तर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि महत्त्वाचे संदेशही (Career Mantra) नव्या जुन्या पिढीला दिले जातात. याच कारणामुळे मुंबई विद्यापीठात कठपुतली खेळाचा सर्टिफिकेट कोर्स शिकवला जातो.

3. चहाची चव चाखणे –

आपल्याला फक्त चहाची चव चाखून भरपूर पैसे कमावता आले तर? आश्चर्य वाटतय ना… खरं तर, आसाम कृषी विद्यापीठासह अनेक संस्था चहा समोलियर (चहाची चाचणी) चा कोर्स देतात. हा कोर्स केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना दरमहा 50 हजार रुपये कमवण्याची संधीही मिळते. (Career Mantra)

4. बॅचलर ऑफ रुरल स्टडीज –

ग्रामीण जीवनाविषयी प्रेम असेल आणि जमिनीशी कनेक्टेड राहायचं असेल आणि ग्रामीण लोकांसाठी काही करायचं असेल तर बॅचलर इन रुरल स्टडीज या कोर्सला प्रवेश घेता येईल. गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू आहे. अभ्यासक्रमात पशुपालन, शेती व्यवस्थापन, खेळ अशा गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.

5. एथिकल हॅकिंग –

सर्वसाधारणपणे तरुणांचा कल हॅकिंगकडे असतो. पण हॅकिंग हा तोट्याचा सौदा ठरू शकतो, कारण तो बेकायदेशीर मानला जातो. मात्र, अनेक ठिकाणी (Career Mantra) सरकारला हॅकर्सचीही गरज भासते, त्यामुळे अनेक संस्था एथिकल हॅकिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. पुणे येथील ॲरिझोना इन्फोटेकमध्येही 15 दिवसांचा शॉर्ट कोर्स उपलब्ध आहे.