करिअरनामा ऑनलाईन । आजच्या डिजीटल युगात शिक्षण पद्धतीही (Career Mantra) दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. ग्रज्युएशन झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दिवसेंदिवस काही क्षेत्रात अभ्यासक्रमही बदलत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. बदलत्या काळानुसार प्रत्येकाने करिअरमध्ये वाटचल करताना स्वत:ला अपडेट ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या बाबतीत कोणते निर्णय घ्यावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काळजी करण्याची आता गरज नाही. कारण ग्रॅज्युएशननंतर प्रोफेशनल कोर्स तुम्ही करु शकता. आम्ही तुम्हाला अशा कोर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पूर्ण केल्यावर तुमचं करिअर सेट होण्याबरोबरच भरपूर पैसा कमवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.
1. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelliegence – AI)
बदलत्या काळाचा विचार करुन तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्राशी संबंधित कोर्स केला, तर तुमचं करिअर सेट होऊ शकतं. तंत्रज्ञान क्षेत्रात (Career Mantra) AI तज्ज्ञांना मोठी मागणी असते. तुम्ही या क्षेत्रात डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करु शकता. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या हे कोर्स ऑफर करतात.
2. डेटा सायन्स (Data Science)
तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असल्यास तुम्ही डेटा सायन्सचा कोर्सही करु शकता. या कोर्सच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निंग कौशल्ये आणि तंत्रे काशी वापरायची, याबाबत शिकवलं जातं. डेटा सायन्सच्या कोर्सला मोठी मागणी आहे. कारण (Career Mantra) या कोर्सच्या माध्यमातून डेटा सायन्सच्या समस्या सोडवता येतात. या कोर्सला खूप मागणी असल्यामुळं चांगली नोकरा शोधणं अधिक सोपं होईल.
3. पीएमपी सर्टिफिकेशन (PMP Certification)
पीएमपी कोर्सलाही वाढती मागणी असल्यामुळं (Career Mantra) हा कोर्स करणं करिअरबाबतीत फायदेशीर ठरू शकतं. PMP म्हणजे Project Management Professional. या सर्टिफिकेशन कोर्सचा अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे. या अभ्यासक्रमानुसारच तुम्हाला करिअरमध्ये संधी प्राप्त होतात. या प्रमाणपत्रात मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स,आयटी, हेल्थ केअर आणि अन्य काही महत्वाच्या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.
4. डिजीटल मार्केटिंग (Digital Marketing) (Career Mantra)
मार्केटिंगमध्ये करिअर करणं काही क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतं. विशेषत: डिजीटल मार्केटिंगला खूपच मागणी आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या डीजीटल कोर्स करण्याला प्राधान्य देऊ शकता. हा कोर्स करिअर सेट होण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. यामध्ये एसइओ ऑडिटिंग, पीपीसी, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग, मोबाईल अॅडव्हर्टायझिंग अशाप्रकारच्या गोष्टी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तसेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com