Career Mantra : Robotics मध्ये करिअरच्या संधी; ‘या’ 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस येणं आहे आवश्यक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माणसाचं काम सोपं आणि (Career Mantra) वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर सतत अभ्यास सुरू आहे. रोबोटिक्स हे त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. रोबोचा वापर करून कामातलं सातत्य जपण्याचा, जटिल कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठा उपयोग होतो. त्याशिवायही अनेक क्षेत्रांमध्ये आता त्याचा वापर केला जातोय. त्यामुळेच रोबोटिक्स तंत्रज्ञानाला सध्या वाढती मागणी आहे. हे तंत्रज्ञान बहुतांशी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसवर अवलंबून असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोबोटिक्स तंत्रज्ञानात करिअर करायचं असेल, तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकाव्याच लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसबाबत माहिती देणार आहोत…

1. Java (Career Mantra)

कम्प्युटर डेव्हलपर्समध्ये ‘जावा’ ही लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. रोबोटिक्सचीसुद्धा ही खूप आवडती लँग्वेज आहे. डेव्हलपर्सना या लँग्वेजमध्ये पोर्टेबिलिटी आणि स्वातंत्र्य मिळतं. ही लँग्वेज बहुतेकवेळा जावा व्हर्च्युअल मशीन्समध्ये वापरली जाते. त्यामुळेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ती रन (Career Mantra) होऊ शकते. अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठीही या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर केला जातो. त्यामुळेच रोबोटिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी ही लँग्वेज अधिक वापरली जाते.
2. C++

पायथॉन आणि जावा या लँग्वेजेसप्रमाणेच C++ हीसुद्धा एक लोकप्रिय प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जटिल अल्गोरिदम्स हाताळणं, हाय परफॉर्मन्स आणि लो लेव्हल ऑपरेशन्स यामुळे रोबोटिक्ससाठी C++ ही लँग्वेज खूप लोकप्रिय आहे.

3. Python

जावा या लँग्वेजखालोखाल पायथॉन या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा क्रमांक लागतो. रोबोटिक्स डेव्हलपर्समध्ये ही सुद्धा एक लोकप्रिय लँग्वेज आहे कारण या लँग्वेजमुळे सहजता, साधेपणा, रिडेबिलिटी आणि व्हर्सटॅलिटी मिळते. ही लँग्वेज मशीन लर्निंग, कम्प्युटर व्हिजन आणि कंट्रोल सिस्टिम्स (Career Mantra) अशा विविध गोष्टींत वापरता येते. त्याशिवाय त्यात रोबोटिक्स तयार करण्याकरता अनेक ओपन सोर्स लायब्ररीज व फ्रेमवर्क उपलब्ध असतात.

4. Lua

ही लँग्वेज लाईटवेट असून ही हाय परफॉर्मिंग लँग्वेज आहे. त्यामुळे रोबोटिक्सच्या क्षेत्रात खूपच जास्त लोकप्रिय आहे. साध्या आणि शिकण्यासाठी अतिशय सोप्या (Career Mantra) असणाऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजपैकी ही एक लँग्वेज आहे. या लँग्वेजेस छोट्या छोट्या रोबोटिक्स अ‍ॅप्लिकेशन्ससाठी व काही प्रकल्पांसाठी उत्तम असतात.

. MATLAB

MATLAB मध्ये मिळणारी न्युमरिकल कम्प्युटिंग एनव्हायर्नमेंट प्रोग्रॅमिंग लँग्वेज हीदेखील रोबोटिक्समधली आणखी एक लोकप्रिय भाषा आहे. ती रिसर्च व डेव्हलपमेंट, मॉडेलिंग आणि रोबोटिक्स सिस्टिमच्या सिम्युलेशनसाठी वापरली जाते. ही लँग्वेज खूप जणांकडून वापरली जाते. यातही अनेक टूलबॉक्सेस आणि लायब्ररीज आहेत.

कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग यांचा (Career Mantra) वापर करून रोबोटिक्सचं तंत्रज्ञान विकसित होतं. सध्या त्याला भरपूर मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यानं या 5 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची माहिती घेतली पाहिजे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com