Career in Dance Choreography : डान्स कोरिओग्राफीमध्ये करता येईल करिअर; कुठे घ्याल शिक्षण?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नृत्य असो की संगीत…. यांच्याविषयी (Career in Dance Choreography) आकर्षण कोणाला नाही? देशातील प्रत्येक प्रांताला स्वतःची नृत्यकला लाभली आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरात मोठी मागणी आहे. ज्यांना आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, ज्याप्रमाणे मागणी असते; तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम अशा पारंपारीक भारतीय नृत्य प्रकारांनाही देशात आणि जगभरात मागणी आहे.

करिअरमधील विविध संधी
तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे, की या क्षेत्रात प्रसिद्धी मिळविण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. या क्षेत्रात पूर्णपणे करिअर करायचे असेल तर शाळा, महाविद्यालयांमध्ये संगीत, नृत्य शिक्षक म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याबरोबर नृत्य, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे काम मिळू शकते. नृत्य, संगीत प्रशिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये शिक्षण देण्याचे काम पार्टटाइमही केले जाऊ शकते. आपली नोकरी सांभाळून नृत्य, संगीत, गाण्याचे कार्यक्रम करणारे अनेक कलाकारही समाजात आहेत.

स्वतःची नृत्य अकादमी सुरु करु शकता
ओडिसी, कुचीपुडी, कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य या परंपरागत नृत्य प्रकारांबरोबरच आधुनिक नृत्य हा प्रकारही या शिक्षणात समाविष्ट झालेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य दिग्दर्शकांना (Dance Choreographer) सध्या मोठी मागणी आहे. नृत्यशिक्षक, नृत्य संयोजक, स्टेज सेटिंग संयोजक, रिहर्सल सुपरवायझर म्हणून तुम्ही करिअरची सुरुवात करु शकता. नृत्य कलेचे शिक्षण घेणाऱ्यांना अनेक नाट्यसंस्था, लोककला विषयक संस्था यामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्ही स्वतःची नृत्य अकादमी सुरु करू शकता.

12 वी नंतर घेवू शकता पुढील शिक्षण (Career in Dance Choreography)
नृत्यांगना होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर प्रतिष्ठित नृत्य संस्थेत प्रवेश घेऊ शकता. नृत्य शिकण्यासाठी, तुम्ही कोणत्याही संस्थेतून नृत्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री मिळवू शकता. नृत्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्ही फिल्म इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, रिअॅलिटी शो किंवा डान्स शोमध्ये डान्स ऑडिशनसाठी अर्ज करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोरिओग्राफर म्हणूनही तुमचे करिअर सुरू करू शकता.

भारतातील टॉप डान्सिंग स्कूल
नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी नामांकित संस्थेतून डिप्लोमा, बॅचलर किंवा मास्टर्स पदवी घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला (Career in Dance Choreography) हवे असल्यास तुम्ही त्यात संशोधनही करू शकता. भारतातील टॉप डान्सिंग स्कूल आहेत- संगीत नाटक अकादमी, बनारस हिंदू विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, नालंदा नृत्य संशोधन केंद्र, भारतीय विद्या भवन, भारतियार पलकलाईकूडम आणि गांधर्व महाविद्यालय इत्यादि.

अनुभवानुसार मिळतो पगार 
नर्तक अनेक जॉब प्रोफाईलवर काम करतात – डान्स टीचर, कोरिओग्राफी, आर्ट्स अॅडमिनिस्ट्रेशन, योगा आणि पिलेट्स टीचर, डान्स फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर, डान्सर मेडिसिन स्पेशालिस्ट इत्यादि. या क्षेत्रात अनुभवानुसार तुमचा दर्जा आणि पगार वाढतो. एक यशस्वी नर्तक त्याच्या शोद्वारे लाखो रुपये कमवू शकतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नृत्याच्या विशिष्ट प्रकारातही निष्णात होऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com