CAPF Recruitment : गृह खात्याचा ऐतिहासिक निर्णय!! आता ‘या’ 13 भाषांमध्ये देता येणार CAPF कॉन्स्टेबल परीक्षा; पहा कोणत्या?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक (CAPF Recruitment) निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Forces) कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे नवीन भाषेचे स्वरूप जानेवारी 2024 पासून लागू होईल; असेही गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या भाषांमध्ये देता येणार परीक्षा (CAPF Recruitment)
गृह मंत्रालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येणार आहे. या (CAPF Recruitment) निर्णयाअंतर्गत सीएपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी आता मराठी, बंगाली, आसामी, गुजराती, पंजाबी, उर्दू, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओडिया, मणिपुरी आणि कोकणी अशा एकूण 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.

गृहमंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी करत म्हंटल आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे असं गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटल आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या नोकरीच्या संधी वाढणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com