Business Success Story : लिंबू-पाण्याने तिला केलं कोट्याधीश; वाचा अवघ्या 11 वर्षाच्या मुलीने कसा सुरु केला बिझनेस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। उत्तम व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे चांगली बिझनेस आयडिया आणि मेहनत (Business Success Story) करण्याची तयारी. या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. यासाठी तुमचं वय किती आहे, हे महत्त्वाचं नसतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उद्योजक मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने अगदी कमी वयात स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आता ती करोडपती बनली आहे. आम्ही ज्या मुलीबद्दल सांगतोय तिने वयाच्या 11 व्या वर्षी लिंबूपाणी विकायला सुरुवात केली आणि आज ती कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. विश्वास बसत नाही ना… मग वाचा या मुलीची यशोगाथा…

Business Success Story of Mikaila Ulmer

11 व्या वर्षी सुरु केला व्यवसाय

मिकायला उल्मेर (Mikaila Ulmer) नावाची ही मुलगी आता 17 वर्षांची आहे आणि तिच्या यशस्वी बिझनेस मॉडेलमुळे ती एक बिझनेस आयकॉनदेखील बनली आहे. मिकायला उल्मेर 11 वर्षांची असताना तिने लिंबूपाणी बनवून घराबाहेर स्टॉल लावून विकायला सुरुवात केली होती. ते लिंबूपाणी लोकांना इतकं आवडलं, की आता मिकायलाने स्वतःचा लेमोनेड ब्रँड बनवला आहे.

Business Success Story of Mikaila Ulmer

अशी सुचली कल्पना (Business Success Story)

मिकायलाच्या बिझनेसबद्दल nypost.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की ती चार वर्षांची असताना तिला तिच्या आजीकडून रेसिपी बुक मिळालं होतं. त्यामध्ये 1940 च्या काळातली फ्लॅक्ससीड (जवस) लेमोनेडची रेसिपी लिहिलेली होती. ही रेसिपी घरी बनवून पाहिल्यानंतर मिकायलाला ती विकण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने घरासमोर स्टॉल लावून हे लिंबूपाणी विकायला सुरुवात केली. पुढे 2016 मध्ये होल फूड्स मार्केट (Whole Foods Market) या सुपरमार्केट कंपनीने मिकायलाच्या ब्रँडशी करार केला. या डीलमध्ये मिकायलाला तब्बल 85 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली. त्यानंतर ती जगातली सर्वांत तरुण उद्योगपती म्हणून प्रसिद्ध झाली.

 

Business Success Story of Mikaila Ulmer

जगातली सर्वांत तरुण उद्योगपती

फ्लॅक्ससीड मिश्रित (जवस मिश्रित) लिंबूपाण्याच्या कल्पनेनं मिकायलाला जगातली सर्वांत तरुण उद्योगपती बनवलं. होल फूड्स मार्केटशी करार केल्यानंतरही मिकायला तिचं उत्पादन सुधारण्यासाठी (Business Success Story) आणि त्यात नवनवीन फ्लेव्हर्स आणण्यासाठी अनेक प्रयोग करत राहते. तिने लिंबूपाण्यात साखरे ऐवजी मधाचा वापर सुरू केला. त्यानंतर तिने मधमाशांच्या संवर्धनाचं कामही सुरू केलं. त्याला तिने Me & The Bees Lemonade असं नाव दिलं. या संदर्भातली माहिती मिकायलाच्या वेबसाइटवर दिलेली आहे.

आजीच्या रेसिपीनं मिकायलाला मिळालं यश

आजीच्या एका जुन्या रेसिपीने मिकायलाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं. ज्या वयात माध्यमिक शिक्षणही पूर्ण होत नाही, त्या वयात मिकायला जगातली सर्वात तरुण आणि प्रसिद्ध उद्योजक बनली आहे. मिकायलाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com