Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय कल्पनेच्या जोरावर करोडोंचा बिझनेसही उभा केला. कनिका यांनी सुरू केलेल्या जेटसेटगो स्टार्टअपला देशभरात ओळख मिळाली आहे. कनिका यांनी आपल्या क्षेत्रात कसा ठसा उमटवला आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत….

१९९० मध्ये एका मारवाडी कुटुंबात कनिका यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रिअल इस्टेट आणि रसायन क्षेत्रात व्यवसाय करतात. वयाच्या 20 व्या वर्षी कनिका यांना कर्करोगाचे (Business Success Story) निदान झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी फक्त कर्करोगावर मात केली नाही तर करोडोंचा व्यवसायही उभा केला.

सुरू केली विमान भाड्याने देणारी पहिली कंपनी (Business Success Story)
कनिका यांनी देशातील विमान भाड्याने देणारी पहिली कंपनी सुरू केली. ‘जेटसेटगो’ असं या कंपनीचं नामकरण करण्यात आलं. भारतातील या पहिल्यावहिल्या कंपनीच्या कनिका टेकरीवाल संस्थापक आहेत. कॅन्सरशी लढा जिंकण्यापासून ते करोडोंचे साम्राज्य उभारण्यापर्यंतची कनिका यांची कहाणी खूप रंजक आहे. यामधून त्यांच्या जिद्दचे प्रदर्शन होते.

कनिका यांनी २०१२ मध्ये गेमचेंजर स्टार्टअप सुरू केला होता. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांना व्यवसायाची कल्पना सूचली आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आजाराविरुद्धची लढाई तर जिंकलीच शिवाय आपली कंपनी सुरू करून एका वेगळ्या उंचीवर नेली आहे.

काय आहे जेटसेटगो स्टार्टअप
३३ वर्षीय कनिका यांनी अगदी कमी वयात सुमारे ४२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे. जेटसेटगो हे त्यांचे स्टार्टअप भाडेतत्वावर चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टर उपलब्ध करून देणारे एक आघाडीचे एअरक्राफ्ट एग्रीगेटर म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे कंपनीने (Business Success Story) आतापर्यंत एक लाख प्रवाशांसाठी तब्बल 6 हजार उड्डाणे केली आहेत.

व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढा देत असताना कनिका यांना आगळावेगळा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. कनिका यांनी जेटसेटगो सुरू करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी प्रथम त्यांच्या वडिलांना विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यावसायिक कल्पनेबद्दल सांगितले. ही कल्पना त्यांच्या वडिलांना फारशी पसंत पडली नाही. वडिलांच्या नाकारानंतरही कनिका आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंत जाणून घेतल्यानंतर व्यवसायाला मूर्त स्वरूप द्यायचे ठरवले.

‘सेल्फ मेड’ महिला
कनिका यांचा व्यवसाय वेग घेत होता. जिद्द आणि चिकाटीच्या (Business Success Story) जोरावर त्यांच्या व्यवसायाची घोडदौड सुरू होती. विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याची त्यांची कल्पना यशस्वी ठरली होती. भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक कनिका टेकरीवाल यांना ‘हुरुन रिच’ लिस्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत ‘सेल्फ मेड’ महिलांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आलं आहे तसंच त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, उद्योजक मासिकाने ‘द स्काय क्वीन’ या पदवीने त्यांना सन्मानित केले आहे. आज कनिकाची स्वतःची 10 खासगी विमाने आहेत. त्यांनी हैदराबाद येथील एका मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केलं आहे. कुटुंब सांभाळण्यासह त्या अगदी कौशल्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com