Business Success Story : केक, पेस्ट्रीने दिला करोडोंचा बिजनेस; वाचा ‘या’ तीन मित्रांची सक्सेस स्टोरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा या तीन कॉलेजच्या मित्रांनी केवळ 2 लाख (Business Success Story) रुपये गुंतवूण केक आणि पेस्ट्री बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. आता या स्टार्टअपची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे. विश्वास बसत नाही ना!! तर वाचा या तीन मित्रांनी असं काय केलं…

उच्चशिक्षण घेतल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी असं बहुतांश जणांना वाटत असतं. परंतु भांडवल नसल्यानं खूप कमी लोक आहेत जे व्यवसाय, उद्योगाकडं वळण्याचा विचार करतात. त्यातही कुणी धाडस केलं तर यश मिळण्याची शक्यता कमी असते. पण कमी भांडवल असले तरी जिद्द, चिकाटी, नावीन्याचा ध्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवणारी समाजात काही निवडक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑनलाइन बेकरी स्टार्टअप बेकिंगो याचा उल्लेख करावा लागेल.

Business Success Story

तिघेही एकत्रच शिकले (Business Success Story)

हिंमाशू, श्रेय व सुमन या तिघा मित्रांचं 2006 मध्ये नवी दिल्ली येथील नेताजी सुभाष विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर तिघांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीही केली. 2010 मध्ये फ्लावर ऑरा नावाने कंपनी सुरू केली. फुलं, केक, भेटवस्तू अशा वस्तूंशी संबंधित ऑनलाइन सेवा देण्यास त्यांनी सुरूवात केली. ‘दी विकेंड लीडर’च्या रिपोर्टमध्ये सुमन यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यवसायाची सुरुवात ग्रुरूग्राम येथील एका इमारतीच्या तळमजल्याच्या ठिकाणावरून करण्यात आली.

‘व्हॅलेंटाइन डे’ने उजळलं भाग्य

केवळ 2 लाख रुपये गुंतवून फेब्रुवारी 2010 मध्ये फ्लॉवर ऑरा कंपनी सुरू करण्यात आली. यानंतर एका वर्षाने सुमन या व्यवसायाशी जोडले गेले. अगदी सुरुवातीच्या काळात कंपनीत केवळ एकच कर्मचारी होता. तोच कर्मचारी (Business Success Story) कस्टमर सर्व्हिस रिप्रझेंटेटिव्हचे काम करण्यासह ऑपरेशन व डिलिव्हरी आदी सर्व गोष्टी सांभाळायचा. 2010 मधील व्हॅलेंटाइन डे कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. त्या दिवशी कंपनीला इतक्या ऑर्डर मिळाल्या की, को-फाउंडर हिमांशू आणि श्रेय यांनाही डिलिव्हरीसाठी जावं लागलं. याच यशामुळे त्यांना वेगळं काही करण्याची प्रेरणा मिळाली.

Business Success Story

असा झाला बेकिंगोचा विस्तार

हिमांशू, श्रेय आणि सुमन यांनी 2016 मध्ये एकत्र येऊन बेकिंगो नावाने नव्या ब्रँडची सुरूवात केली. देशभरातील विविध ठिकाणांवर एकाच ब्रँडचे ताजे केक पोहोचवता यावेत, या विचाराने बेकिंगोचा विस्तार झाला. सध्या ही कंपनी दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांसह मेरठ, पानिपत, रोहतक आणि कर्नालसारख्या छोट्या शहरांतही सेवा देत आहे. कंपनीची 30 टक्के विक्री ही वेबसाइटच्या माध्यमातून होते. तर 70 टक्के विक्री ही स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून होते. बेकिंगोने 2021-22 मध्ये 75 कोटींपेक्षा अधिक उलाढाल केली. सध्या कंपनीत 500 पेक्षा अधिक लोक (Business Success Story) काम करत आहेत. कंपनीने यावर्षी दिल्लीत त्यांच्या पहिला ऑफलाइन आउटलेट ची सुरूवात केली आहे.दरम्यान, व्यवसायाकडे वळणारे अनेकजण असतात. पण मेहनत, सातत्य आणि योग्य दिशा ठरवून व्यवसाय केल्यास त्यात यश नक्की मिळतं. व्यवसाय करताना नवनवीन संकल्पना राबवणंही तितकचं महत्त्वाचं असतं हे तिन्ही मित्रांनी यशस्वी ब्रँडची निर्मिती करून दाखवून दिलं आहे.

Business Success Story

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com