Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून पासून कपड्यांपर्यंत सर्व वस्तू एका क्लिकवर येथे उपलब्ध होतात आणि या वस्तु आपल्याला अगदी घरपोच मिळतात. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ही कंपनी कक्ष उभारली? त्यांना या व्यवसायात यश कसं मिळवता आलं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पाहूया त्यांच्या रोमांचक आणि खडतर प्रवासाविषयी… वाचत रहा फ्लिपकार्टची यशोगाथा……

दोघेही आहेत उच्च शिक्षित.. IIT मधून घेतली डिग्री
सचिन आणि बिन्नी बन्सल हे IIT दिल्लीचे विद्यार्थी आहेत. हे दोघे जेव्हा आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. अनेकांना (Business Success Story) सचिन आणि बिन्नी भाऊ वाटतात; पण तसे नाही… योगायोगाने या दोघांचे आडनाव एकच आहे; पण हे दोघे भाऊ नसून मित्र आहेत.

फ्लिपकार्टची स्थापना अशी झाली (Business Success Story)
IIT ची डिग्री असूनही गुगलने बिन्नी बन्सल यांना दोनदा नोकरी नाकारली. यानंतर त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट आला आणि त्यांनी मित्रासह व्यवसायात उडी घेतली. सचिन आणि बिन्नी दोघेही ऑनलाईन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत होते. त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप आले आणि फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून झाली. बिन्नी आणि सचिन यांनी एकूण 2,71,000 रुपये जमा करून भांडवल उभे केलं आणि फ्लिपकार्टची स्थापना झाली.

अॅमेझॉनशी स्पर्धा
विशेष म्हणजे अॅमेझॉनचीही अशीच सुरुवात झाली आणि नंतर सर्व वस्तू ऑनलाईन विकायला सुरुवात केली. फ्लिपकार्टने ऑनलाईन बुकस्टोअर म्हणूनही सुरुवात केली आणि ही कंपनी भारतातील अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी बनली.

2BHK फ्लॅटमधून सुरु केलं काम
2007 मध्ये फ्लिपकार्ट पहिल्यांदा बंगळुरूमध्ये एका छोट्या 2BHK फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आली होती. सचिन बन्सल याने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केले. तर बिन्नीने वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचे सीओओ पद स्वीकारले.
फ्लिपकार्ट भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी आहे.

फ्लिपकार्टची यशस्वी घोडदौड
2012 मध्ये 150 दशलक्ष डॉलर उभारल्यानंतर, फ्लिपकार्ट लवकरच भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. वॉलमार्टने कंपनीचे 77 टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतल्यानंतर बिन्नी आणि सचिन या दोघांनीही कंपनी सोडली.

सचिन आणि बिन्नी बन्सल आहेत अब्जाधीश (Business Success Story)
वॉलमार्टने 16 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक करारात फ्लिपकार्टचे 77 टक्के शेअर्स खरेदी केले. इंटरनेट फर्मशी संबंधित हा सर्वात मोठा करार झाला. कॅश आऊट करून कंपनी सोडली तरीही सचिन आणि बिन्नी बन्सल अजूनही अब्जाधीश आहेत. सचिन बन्सल यांची एकूण मालमत्ता 1.3 अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात 10,648 कोटी रुपये आहे आणि बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती 11,467 कोटी रुपये आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com