Budget 2023-24 : सर्वात मोठी बातमी!! देशावरचं नोकर कपातीचं टेन्शन झालं दूर; बजेटच्या आधी आली गुड न्यूज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Budget 2023-24) उद्या 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund ) अर्थात IMFने भारतासाठी मोठी गुड न्यूज दिली आहे. IMF च्या मते आर्थिक वर्ष 2023 आणि 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. IMF ने असे देखील म्हटले आहे की, याकाळात (Budget 2023-24) भारताच्या विकासाचा वेग 6.1 इतका असेल, तर 2024 मध्ये 6.8 इतका विकास दर असेल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना दुसऱ्या बाजूला जगाची अर्थव्यवस्था मात्र 2023 मध्ये घसरण्याची शक्यता असल्याचे IMFने म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 2022 मध्ये 3.4 टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 2023 मध्ये तो 2.9 इतका असू शकतो आणि 2024 मधील ग्रोथ ही 3.1 टक्के असू शकते.

IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संचालक Pierre-Olivier Gourinchas यांनी सांगितले की, भारतासाठी आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही झाला. या वर्षी भारताच्या विकासाचा वेग 6.8 टक्के असू शकतो. पुढील वर्षी यात थोडी घट होऊ शकते आणि (Budget 2023-24) विकास दर 6.1 इतका राहिल. या अंतर्गत गोष्टींची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असेल. भारताची अर्थव्यवस्था एक ब्राइट स्पॉटचे काम करेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com