करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील (Bodhi Ramteke) चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण आणि संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस’ ही तबल 45 लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
यासाठी संपूर्ण जगभरातून 15 स्कॉलर्सची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे आलेल्या बोधी रामटेकेची निवड होणं ही बाब खूप आनंददायी आहे. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन येथे पुढील दोन वर्ष जगातील विविध चार नामांकित विद्यापीठाच्या संयुक्त (Bodhi Ramteke) अभ्यासक्रमात बोधी उच्चशिक्षण घेणार आहे. बोधीची सामाजिक वकीली, प्रत्यक्ष जमीन पातळीवरचं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. खरंतर त्याच्या या कामाचाच सन्मान आहे.
बोधी हा नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी. त्यांनी पुण्यातील आय.एल.एस. लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मित्रांसमवेत राज्यभर विधी विषयक उपक्रम राबवले. ब्रिटिश सरकारची ‘चेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळवलेले वकील ॲड. दीपक चटप, ॲड. वैष्णव इंगोले आणि ॲड. बोधी या तरुण वकीलांनी मिळून ‘पाथ संस्थेची’ स्थापना केली आहे. पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचं विधायक काम हे तरुण करत आहेत.
बोधी यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी (Bodhi Ramteke)
- या शिष्यवृत्तीसाठी सामाजिक व विधिविषयक संस्थेची ‘समता फेलोशिप’ मिळवून त्याद्वारे संविधानिक मुल्यांवर काम केले.
- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे मूलभूत हक्कांचे प्रश्न पाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्य मानवाधिकार आयोगात पोहचवण्यासाठी केलेली याचिका महत्त्वाची ठरली आहे.
- आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणाऱ्या अडचणी यावर पाथ फाउंडेशनने केलेले संशोधन त्यांनी इजिप्त येथे झालेल्या अंतिरराष्ट्रीय समर स्कूलमध्ये मांडले.
- दुर्गम गाव मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहून जनहित (Bodhi Ramteke) याचिकेच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम वंगणुर भागातील 1500 नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला; याची फलश्रुती म्हणजे उच्च न्यायालयाने सरकारकडे निधीची तरतूद करत मूलभूत सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.
- नुकतेच प्रकाशित झालेले त्यांचे कायदेविषयक माहिती देणारे ‘न्याय’ हे पुस्तक वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण ठरले आहे.
- बोधी सध्या संस्थात्मक कामासोबतच दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील या तरुण वकीलाला मिळालेल्या (Bodhi Ramteke) जागतिक शिष्यवृत्तीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग समाजातील सर्व घटकांसाठी व्हावा यासाठी मी कार्यरत राहिन. तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी; यासाठी मी प्रयत्न करणार आहे;” असे बोधी म्हणाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com