करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने दहावी आणि बारावीच्या उद्या होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षा ह्या उद्या दिनांक 26 जुलै रोजी होणार होत्या. मात्र सध्या राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल (Board Exam)
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू असून या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता इयत्ता 10 वीची पुरवणी परीक्षा 31 जुलै रोजी होणार आहे. तर इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
परीक्षेच्या बदललेल्या तारखा
उद्या दिनांक 26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयांचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. मात्र आता हा पेपर दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान होणार आहे. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा (Board Exam) वाणिज्य आणि संघटक व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान एमसीव्हीसी पेपर दोन हे तीन पेपर होते हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीनही पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com