करियरनामा ऑनलाईन। मुंबई महापालिकेत काम करण्यासाठी BMC Recruitment 2024 इच्छुक असणाऱ्यांसाठी आणि इंजिनीयरचं शिक्षण घेतलेल्या सर्वांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा सर्व शाखांतील कनिष्ठ, दुय्यम अभियंता पदाच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे.
पदाचे नाव BMC Recruitment 2024 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
पदसंख्या – 690 जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) – 130
दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) – 77
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार ( मूळ जाहिरात वाचावी )
वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष
अर्ज शुल्क –
सर्वसाधारण उमेदवार – रु. 1000 / –
इतर उमेदवार – रू. 500 / –
अर्ज पद्धती – ऑनलाइन BMC Recruitment 2024
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://rrbmumbai.gov.in/