BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या 1846 जागांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे (BMC Recruitment 2024) अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहायक (लिपिक) पदांच्या एकूण 1846 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – कार्यकारी सहायक (लिपिक)
पद संख्या – 1846 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा –
1. अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
2. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
अर्ज फी –
1. अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.1000/- (वस्तु व सेवाकरासह)
2. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.900/- (वस्तु व सेवाकरासह)
मिळणारे वेतन – Rs. 25,500/- to Rs. 81,100/- रुपये दरमहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता (BMC Recruitment 2024) –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक)1) (i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
आणि
(ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
किंवा
(ⅲ) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुर्णासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2)उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3)उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
4) (i) उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक /माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील.
(ii) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, खेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक (BMC Recruitment 2024) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
6. अर्ज करण्यापूर्वी PDF काळजीपूर्वक वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com