करियरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबईत तब्बल 2771 होमगार्ड BMC Home Guard Bharti 2025 या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह 10 जानेवारी 2025 या शेवटच्या मुदतीच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
या जाहिराती अंतर्गत होमगार्ड BMC Home Guard Bharti 2025 या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदांसाठी 2771 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
या पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BMC Home Guard Bharti 2025
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 20 ते 50 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती –
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
भरतीसाठी इतर पात्रता –
- पुरुष उमेदवार: उंची किमान 162 सेमी
- महिला उमेदवार: उंची किमान 150 सेमी
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ही आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
- जन्मतारीख दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.