करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागातून शाळा किंवा महाविद्यालयात (Big News) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस. टी. चा प्रवास नेहमीच सोईस्कर आणि परवडणारा ठरतो. महिन्याच्या सुरवातीला पास काढला की महिनाभराची काळजी मिटते. पण पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तासनतास भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. परंतु आता या विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी समोर येत आहे. कारण आता विद्यार्थ्यांना एस. टी. चे पास हे त्यांच्या शाळेमध्ये वितरित केले जाणार आहेत. एस. टी. महामंडळाकडून याबाबत सूचना देखील देण्यात आल्या आहेत. एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एस. टी. प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
पासच्या रकमेत 66% सवलत मिळणार
घरापासून शाळा, महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांच्या एसटीच्या पासमध्ये 66% इतके सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना आता एकूण रकमेच्या (Big News) केवळ 33 टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि त्यातून त्यांना महिन्याचा पास काढून मिळेल. त्याचप्रमाणे ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. पासचे वितरण देखील करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एस. टी. च्या पास केंद्रावर जाऊन हे पास घ्यावे लागतील.
लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा (Big News)
उद्या दि. 18 जून पासून एस. टी. चे पास थेट शाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ही एक विशेष मोहीम आता शासनाकडून राबवली जात आहे. त्यासाठी आता शाळा प्रशासनाला शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. या योजनेचा लाभ आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com