Big News : सावधान!! कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत झाले ‘हे’ महत्वाचे बदल; गैर प्रकारांना बसणार आळा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Big News) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत डमी उमेदवारांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेकडून जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात मोठी पावले उचलण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान डमी उमेदवारांकडून विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टायपिंग करून घेणे, परीक्षा केंद्रांवर बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, असे अनेक प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. हे गैर प्रकार टाळण्यासाठी परीक्षेत बदल केले जाणार आहेत; अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

आढळून आले गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार (Big News)
डिसेंबर २०२३ आणि त्याआधी पार पडलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान केंद्रावर डमी उमेदवार बसवणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहेत. डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये, यासाठी पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येणार आहेत; अशी माहिती डाॅ. बेडसे यांनी दिली.

परीक्षेतील नवे बदल असे आहेत
संगणक टंकलेखन परीक्षेत बोगस उमेदवारांसह अन्य गैर (Big News) प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रश्नांचा क्रम बदलण्यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली गेली असून, त्यासाठी 8 ऐवजी 5 मिनिटे दिली जाणार आहेत. स्पीड पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव होण्यासाठी 3 मिनिटांचा सराव उतारा देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com