करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Big News) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येतात. काहीवेळा प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ येते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील,अशी माहिती शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. विविध (Big News) समाज घटकातील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी जातो.त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्यास काही दिवसांची सवलत मिळावी; अशी मागणी केली जात होती. या मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com