करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान (Big News) लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये UPSC नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2024 आणि NEET PG 2024 सारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (KCET), महाराष्ट्र हेल्थ आणि टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट MHT CET (PCM, PCB), TS EAPCET (EAMCET) परीक्षा, TS POLYCET आणि ICAI CA यासारख्या अनेक परीक्षा निवडणुकांदरम्यान होणार आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पाहूया….
एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी) परीक्षा यापूर्वी 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार होती. पण नंतर या परीक्षेची तारीख बदलून 2 मे वरून 17 मे करण्यात आली आहे. मात्र आता ही परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 दिवस आधी उपलब्ध होईल.
1. TS EAPCET 2024 (Big News)
TS EAPCET 2024 म्हणजेच तेलंगणा राज्य अभियांत्रिकी कृषी आणि वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षा 9, 10, 11 आणि 12 मे रोजी घेतली जाईल. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल.
2. जेईई मुख्य 2024 सत्र-2 परीक्षा
जेईई मेन (JEE) 2024 सत्र-2 च्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा ४ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार होती. मात्र आता ही परीक्षा 4 एप्रिल ते 12 एप्रिलपर्यंत होईल.
3. तेलंगणा राज्य पॉलिटेक्निक सामान्य प्रवेश परीक्षा
तेलंगणा राज्य पॉलिटेक्निक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच (Big News) टीएस पॉलीसेट २०२४ पूर्वी १७ मे रोजी होणार होती. मात्र आता ही परीक्षा २४ मे रोजी होणार आहे. सकाळी 11 ते 1.30 या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
4. NEET PG 2024
NEET PG (NEET PG) 2024 परीक्षा 23 जून रोजी घेण्यात येईल. याचा निकाल १५ जुलैपर्यंत येईल. तर समुपदेशन 5 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होईल.
5. CA परीक्षा
ICAI CA (CA) इंटरमिजिएट ग्रुप 1 ची परीक्षा 7 मे ऐवजी 3, 5 आणि 9 मे रोजी घेतली जाईल. तर गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 मे ऐवजी 11, 15 आणि 17 मे रोजी होणार आहे.
6. JEE Advanced 2024
JEE (JEE) Advanced 2024 ही परीक्षा 26 तारखेला होणार आहे. आयआयटी मद्रासचा परीक्षेची तारीख बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. JEE Advanced 2024 साठी अर्जाची विंडो 21 एप्रिल रोजी उघडेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे.
7. CUET UG 2024
CUET UG 2024 (CUET UG) ही परीक्षा 15 मे ते 31 मे दरम्यान (Big News) घेतली जाईल. 20 मे आणि 25 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांशी या परीक्षेची टक्कर होणार आहे. NTA ने अद्याप परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर केले नाही. NTA ने सध्या CUET UG साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. NTA परीक्षेच्या तारखेतही बदल करेल; अशी माहिती आहे.
8. NEET UG 2024
NEET UG (NEET UG) परीक्षा 5 मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यानच ही परीक्षा होणार आहे. परंतु NTA ने अद्याप तारखेत बदल करण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.
9. UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 (Big News)
UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा 26 मे रोजी होणार होती. यूपीएससीची प्राथमिक परीक्षा आता १६ जूनला होणार आहे. निवडणूक आयोगाने एप्रिलमध्ये 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com