करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Big News) आनंदाची बातमी आहे. देशातील युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयफोन (iPhone) निर्माता Apple (Apple) या कंपनीमध्ये लाखोच्या संख्येत नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात Apple कंपनीमध्ये तब्बल पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
Apple कंपनी भारतात मुसंडी मारणार
Apple कंपनीच्या माध्यमातून भारतात 5 लाख नोकरीच्या संधी (Big News) उपलब्ध होणार आहे. ही बातमी देशातील युवकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. Apple कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हालचीलांना देखील वेग आला आहे. Apple सध्या भारतात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
कर्मचाऱ्यांच्या संख्येत 3 टक्क्यांनी वाढ होणार (Big News)
Apple कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळं Apple शी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. या निर्णयामुळं अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणार आहे. सध्या जगातील एकूण iPhone उत्पादनापैकी 7 iPhone हे भारतात तयार होतात. 2030 पर्यंत याची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे. ज्या युवकांना अॅपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com