करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या गृहखात्याची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री (Big News) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 14 हजार 956 पदे पोलीस शिपाई पदांची असणार आहेत. तर राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत. 6 हजार 740 पदे मुंबई तर 720 पदे पुणे शहरात भरली जाणार आहेत.
1 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला गती मिळणार
राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक (Big News) नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.inया संकेतस्थळावर पोलीस भरतीसाठीची माहिती मिळणार आहे. दरम्यान अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
विभागनिहाय पदे (Big News)
मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) (Big News) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 14956
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com