Big News : खुषखबर!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 10वी-12वीची परीक्षा फी माफी; करावा लागणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | निसर्गाने साथ न दिल्याने यावर्षी (Big News) राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळसदृश्य महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची फी भरली होती ती परीक्षा फी त्या विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. आतापर्यंत त्यासाठी पाच ते सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन्ही वर्गातील 5 लाख 75 हजार 559 विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले होते यासाठी साधारणपणे 28 कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज आहे.

विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी मिळणार मुदतवाढ
यावर्षी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ झाला आहे, तर 158 तालुक्यांमध्ये 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्या परिसरातील (Big News) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फी माफीसाठी पात्र असलेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयांनी बोर्डाला ऑनलाईन माहिती पाठवायची आहे. बोर्डाकडून त्यासाठी वारंवार माहिती देखील येत आहे. या वेळा आधी पाच ते सहा वेळा मुदत वाढ दिलेली आहे, तरी अजून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती बोर्डाकडे दिलेली नाही. त्यामुळे बोर्ड अजून काही दिवसांची मुदतवाढ देणार आहे.

निधीसाठी शासनास पत्र (Big News)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा फी भरली होती. त्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 8 कोटी 90 लाख रुपयांचा निधी बोर्डाकडे प्राप्त झालेला आहे. परंतु परीक्षा शुल्क माफीसाठी 28 कोटी रुपये लागणार आहेत.

3 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त (Big News)
आतापर्यंत 10 वी च्या 3 लाख 37 हजार 44 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे. तर इयत्ता बारावीतील 2 लाख 38 हजार 515 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला मिळाली नाही. तसेच विद्यापीठासह उच्च महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीचा देखील लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी माहिती विद्यापीठ आणि उच्च महाविद्यालयाने सादर केली आहे. परंतु अजूनही विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळाला नाही.

परीक्षा शुल्क माफीसाठी प्राप्त झालेले अर्ज
1. इयत्ता 10 वी – 3,37,044 विद्यार्थी
2. इयत्ता 12 वी – 2,38,515 विद्यार्थी
एकूण – 5,75,559 विद्यार्थी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com