भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे ‘या’ तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे ‘हा’ पॅटर्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

लढा कोरोनाशी | नवी दिल्ली । कोरोना व्हायरस ने सध्या जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देशालाही अद्याप कोरोनावर मात करण्यात यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर भारतातील भिलवाडा जिल्ह्याने मात्र अतिशय नियोजनबद्धरीत्या कोरोनावर मात केली आहे. सध्या भारत सरकार हा भिलवाडा पेटर्न देशभर लागू करण्याचा विचार करत आहे. भिलवाडा पेटर्न मागे तेथील ५६ वर्षाचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांचे डोके आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉपर राहिलेल्या टीना दाबी Tina Dabi या भिलवाडा येथे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. Bhilwara Model

राजस्थान मधील कापड उद्योगा साठी प्रसिद्ध असलेला भिलवाडा शहर देशभरात कोरोना बद्दल च्या यशस्वी उपाययोजनांसाठी “ भिलवाडा मॉडेल “म्हणून प्रसिद्ध होत आहे. सुरवातीला एक ही कोरोना पिडीत रुग्ण नसलेल्या शहरात मार्च अखेर एकदम २६ रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने तातडीने कलेक्टर राजेंद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स करण्यात आली. यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपाय योजना केल्यामुळे मागील १० दिवसांत भिलवाडा जिल्ह्यात एक ही नवीन कोरोनाचा रुग्ण सापडला नाहीये. संपूर्ण जगात कोरोना थांबण्याचा नाव घेत नसताना भिलवाड्यात ते कसे शक्य झालं की पंतप्रधान मंत्री ते संपूर्ण देशात लागू करण्याचा विचार करत आहेत. Bhilwara Model

हे भिलवाडा मॉडेल नक्की काय आहे हे समजून घेऊयात.

1.स्क्रिनिंग टेस्ट – संपूर्ण शहरात 6 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनि मिळून 25 लाख स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आल्या. या मध्ये 7 हजार च्या वर लोकांना होम quarantine करण्यात आले तर काहींना हॉटेल, रिसॉर्ट ,आणि धर्मशालांमध्ये ठेवण्यात आले. Bhilwara Model

2.सॅनिटाझशन – भिलवाडा शहरातील एकूण 55 वार्ड मध्ये दोनदा हापौक्लोराईड ने फवारणी करण्यात आली.

3.संक्रमण करणारे दवाखाने बंद – ज्या ज्या दवाखान्यानमध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता ती दवाखाने बंद करून त्यातील सर्व कर्मचाऱ्याची तपासणी करण्यात आली . Tina Dabi

4.जिथे कोरोना तिथे कर्फ्यु – जिथे जिथे कोरोनाचे रुग्ण सापडले गेले तिथे पूर्ण पणे कर्फ्यु लावण्यात आला .

5.वाहतूक बंद – तात्काळ कोरोनाला थोपावण्यासाठी खाजगी तसेच सरकारी वाहतूक बंद करण्यात आली.

6.रेशनींग चा पुरवठा – गरीब ,कामगार लोकांची उपासमार न व्हावी यासाठी घरपोच धान्य व इतर जीवनोपयोगी गोष्टींची पूर्तता करण्यात आली. Bhilwara Model

7.जिल्ह्याच्या सीमा बंद – शेजारील जिल्ह्यातील कसली ही वाहतूक होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करून 20 ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आल्या.

एकूणच लोकांचा सहयोग आणि सरकारी यंत्रणेची तत्परता यामुळे भिलवाडा जिल्ह्यात कोरोना वर नियंत्रण मिळवण्यास सरकारला यश येताना दिसतंय. देशभरात देखील अशाच पद्धतीने लोकांच्या व शासकीय यंत्रणेच्या सहभागाने कोरोनाच संकटाला थोपवता येऊ शकत.

विकास वाळके
9673937171
(लेखक मुंबई स्थित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे दलित आणि आदिवासी विषयावर अभ्यास करत आहेत)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com