करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी (BECIL Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या भरती प्रक्रियेतून मॉनिटर पदाच्या एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 34,362 रुपये पगार मिळू शकतो.
संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लि. (BECIL)
पद संख्या – 44 पदे
भरले जाणारे पद – मॉनिटर (Monitor)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BECIL Recruitment 2024)
- Graduate in any discipline.
- Proficiency in Computer with knowledge of Language
Concerned - One year experience in the field of Media / News.
Desirable: PG Diploma in Journalism/Bachelor in
Journalism/ Mass Communication
अर्ज फी –
1. सामान्य, ओबीसी उमेदवार, माजी सैनिक यांना अर्ज फी म्हणून रु. 885 भरावे लागतील.
2. SC, ST, EWS आणि PH श्रेणीतील उमेदवारांना 531 रुपये भरावे लागतील.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम Besil च्या अधिकृत वेबसाइट besil.com वर जा.
3. करिअर पृष्ठावर क्लिक करा. (BECIL Recruitment 2024)
4. यानंतर नोंदणी फॉर्म (ऑनलाइन अर्ज) वर क्लिक करा.
5. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
6. अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
7. यानंतर विहित शुल्क भरा.
8. पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com