बालभारतीची स्वतंत्र वाहिनी, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । बालभारतीचा ५४ वा वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याची घोषणा केली. बालचित्रवाणीच्या संग्रहातील शिक्षणपूरक कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात वर्षां गायकवाड बोलत होत्या. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ‘किशोर’च्या मोबाइल अ‍ॅप आणि बोधचिन्ह, पन्नास किशोर गोष्टी हे पुस्तक, बालभारतीचे नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे बालरक्षक चळवळीतील अनुभवांवर आधारित ‘नवी पहाट’, प्रयोगशील शाळांची माहिती देणाऱ्या ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमात वर्षां गायकवाड म्हणाल्या, “करोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींतही न डगमगता बालभारतीने छपाई ते वितरणाचे काम केले. करोना हे आव्हान आहे, तशीच संधीही आहे. या निमित्ताने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. करोना काळात बालचित्रवाणीसारख्या शैक्षणिक वाहिनीची गरज जाणवली. त्यामुळे बालभारतीची स्वतंत्र वाहिनी वर्षभरात निर्माण करण्यात येईल. तसेच बालचित्रवाणीतील शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.” तसेच राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डीआयईटी)  प्रशिक्षित शिक्षकांतर्फे  विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात येईल. समुपदेशकांची यादी जाहीर करण्यात येईल,

कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त बालवाचकांना भेट म्हणून किशोरची वार्षिक वर्गणी ५० रुपये करण्यात आली आहे. ५० रुपये वर्गणीत दिवाळी अंकासह वर्षभराचे अंक मिळतील. नवीन अ‍ॅप आणि संके तस्थळाद्वारे वार्षिक वर्गणी भरता येईल, असे सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com